Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

करोनाच्या नवीन संसर्गाला न घाबरण्याचे आवाहन, जेएन-वन विषाणूची लक्षणे सौम्य, वैद्यकीय तज्ञांची माहिती

7

म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोना विषाणूच्या ‘जेएन-वन’ या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग येथे आढळून आला आहे. हा विषाणू वेगाने पसरणारा असला, तरी त्याची लक्षणे सौम्य स्वरूपाची असून, रुग्ण एका आठवड्यात बरा होतो, असे आरोग्य विभागासह वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

केरळ येथे काही दिवसांपूर्वी एका ७९ वर्षीय महिलेला या विषाणूचा संसर्ग झाला होता. आता ही महिला पूर्णपणे बरी झाली असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. पुणे शहरात सद्यस्थितीत करोना आणि ‘जेएन-वन’ या विषाणूंच्या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ‘जेएन-वन’मध्येही सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, थकवा यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असलेल्या रुग्णांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग यासारख्या सहव्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.

उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांनी मला मराठा उपसमितीचा अध्यक्ष होऊ दिले नाही, पडद्याआड प्रयत्न: एकनाथ शिंदे

महापालिकेने घेतला आढावा

‘जेएन-वन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला आहे; तसेच फ्लूसदृश रुग्णांचे सर्वेक्षण करून संशयित रुग्णांची करोना तपासणी करावी अशा सूचना सर्व महापालिका रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. शहरात सरकारी आणि खासगी मि‌ळून १०४ रुग्णालये आहेत. शहरात ऑक्सिजनच्या २२९६, आयसीसू ६७४, व्हेंटिलेटर ४२९, आयसोलेशनच्या १३०१ खाटा उपलब्ध आहेत. याशिवाय २४४२ डॉक्टर, ३८४४ परिचारिका, ८४९ आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

‘जेएन-वन’ची लक्षणे

– थंडी वाजणे

– थकवा येणे

– ताप येणे

पुणे शहरात आतापर्यंत ‘जेएन-वन’ विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हा विषाणू वेगाने पसरणारा असला, तरी याची लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र, काही देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.

– डॉ. राजेश कार्यकर्ते, राज्य समन्वयक, जीनोम सिक्वेंन्सिंग

राज्यात जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत ‘जेएन-वन’ या विषाणूचा एक रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला आहे. सध्या आढळलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये.

– डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग

लोकसभेत तीन महत्त्वाच्या फौजदारी विधेयकांना मान्यता, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा

जेएन-वन विषाणूबाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.

– तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

पुणे लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना ठाकरे गट मैदानात

Read Latest Mharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.