Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सावधान! पुण्यात ‘भाईं’चे वलय वाढता वाढे, अट्टल गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा अधिक भरणा

40

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गल्लीतील ‘भाईं’भोवतीचे वलय पाहून गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढल्या जाणाऱ्या मुलांचा संघटित गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर भरणा झाल्याचे दिसून येते. शहर पोलिसांनी चालू वर्षात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केलेल्या एकूण गुन्हेगारांत ११ टक्के अर्थात, ७० अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश आहे.

शहरात अलीकडे काही वर्षांत अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. २०२१ या वर्षात ५५६ अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल आहे, तर २०२२मध्ये ५६० आणि २०२३ वर्षात ३८८मध्ये इतक्या अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यंदाच्या वर्षात गुन्हेगारांची संख्या घटली असली तरीही गंभीर गुन्ह्यातील त्यांचा सहभाग वाढला आहे. शहर पोलिसांनी २०२३मध्ये आतापर्यंत १०२ गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका कारवाई केली असून, त्यामध्ये ६५० गुन्हेगारांना कारागृहात पाठवले आहे. १६ ते १८ वयोगटातील ७० गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसभेत तीन महत्त्वाच्या फौजदारी विधेयकांना मान्यता, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा
केंद्रीय गुन्हे नोंदणी अहवालातील (वर्ष २०२२) आकडेवारीनुसार, देशात गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलांचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात अल्पवयीन मुलांवर दाखल गुन्ह्यांबाबत मुंबई पहिल्या स्थानी आणि पुणे दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे तरुणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

‘मकोका’ची सर्वाधिक कारवाई

– खुनाचे प्रयत्न करणाऱ्या टोळ्यांवर मकोकाची सर्वाधिक कारवाई.

– मकोका कारवाई झालेल्या १०२ गुन्हेगारी टोळ्यांपैकी ४८ गुन्हेगारी टोळ्यांवर खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा.

– अल्पवयीन मुलांकडून जाणीवपूर्वक गंभीर गुन्हे करून घेतले जात असल्याचे काही प्रकरणात समोर आले.

अल्पवयीनांवर ‘मकोका’ कसा?

अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर फारशी गंभीर कारवाई होत नाही किंवा त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली जाते. त्यामुळे त्यांना कायद्याची भीती राहत नाही. मात्र, कायद्यातील सुधारणेनुसार १६ ते १८ वयोगटातील मुलांचा गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्यास त्यांना ‘प्रौढ’ म्हणूनच गृहित धरून त्यांच्यावर खटला चालविण्यात येतो. त्यानुसार शहर पोलिसांनी अल्पवयीन गुन्हेगारांवर ‘मकोका’ कारवाई केली आहे.

अल्पवयीन मुलांवर दाखल गुन्ह्यांचा आढावा

वर्ष गुन्हे आरोपींची संख्या

२०२१ ३५७ ५५६

२०२२ ३०८ ५६०

२०२३ २५५ ३८८

अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यातील सहभाग आणि गुन्हेगारी प्रवृत्तींसोबत जाणे, यामुळे वेळीच कठोर कारवाईची गरज आहे. त्यानुसार गंभीर गुन्ह्यातील मुलांवर ‘मकोका’नुसार कारवाई केली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पोलिसांकडून विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

– अमोल झेंडे, उपायुक्त, गुन्हे शाखा

Pune News: ‘सौभाग्याचे लेणे’ मिळताच तरळले अश्रू, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यांचा लावला छडा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.