Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१५ हजारांच्या बजेटमध्ये आला सोनेरी 5G Phone; कमी किंमतीत १२जीबी रॅमसह वॉटरप्रूफ रेटिंग

8

ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन OPPO A59 5G लाँच केला आहे. ह्या फोनमध्ये शानदार डिजाइन आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. मिडरेंजमध्ये आलेल्या ह्या हँडसेटमध्ये 6GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Dimensity 6020 चिपसेट मिळतो. ओप्पो ए५९ ५जी च्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

OPPO A59 5G ची किंमत

ओप्पो ए५९ ५जी फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. ह्याच्या बेस मॉडेलमध्ये ४जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत १४,९९९ रुपये आहे. तसेच फोनचा मोठा व्हेरिएंट ६जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा ओप्पो मोबाइल Silk Gold आणि Starry Black कलरमध्ये विकत घेता येईल जो ऑनलाइन शॉपिंग साइट्स तसेच ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर देखील सेलसाठी उपलब्ध होईल.

OPPO A59 5G चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो ए५९ ५जी फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन वॉटरड्रॉप नॉचसह आली आहे आणि ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. ह्यावर ७२०निट्स ब्राइटनेस तसेच ९६% NTSC कलर गमुटट देखील मिळतो.

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ आधारित कलरओएसवर चालतो. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी ह्यात माली-जी५७ जीपीयू आहे. सोबतीला ६जीबी पर्यंत रॅम मिळतो. जो रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं आणखी ६जीबीनं वाढवता येतो, अशाप्रकारे ए५९ ५जी मध्ये १२जीबी रॅम देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन १२८जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए५९ ५जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलची बोका लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन ८ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी OPPO A59 5G फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी ओप्पो ए५९ ५जी फोनमध्ये ७ ५जी बँड्स आणि ३.५मिमी जॅक मिळतो. सिक्योरिटीसाठी साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो तसेच ह्यात आयपी५४ रेटिंगही आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.