Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईकरांना दिलासा! करोनाचा नव्याने धोका नाही, मास्क वापराबाबतही पालिका प्रशासनाची माहिती

8

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: देशामध्ये ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराचे रुग्ण आढळत असले तरीही मुंबईमध्ये करोना संसर्गाचा नव्याने धोका नसून गेल्या चार महिन्यांमध्ये मुंबईत करोनामुळे केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गंभीर परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी पालिकेची तयारी असून चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी गुरुवारी दिली.

मुंबईमध्ये ढोबळपणे करोनाच्या काही चाचण्या करण्यात आल्या. डिसेंबरमध्ये करण्यात आलेल्या १,००५ चाचण्यांमधील केवळ ३४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्येही सर्वाधिक ८० टक्के रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीमधील असून उर्वरित रुग्ण झोपडपट्टीमधील आहेत. यातील अनेक रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाही. त्यामुळे त्वरित होणाऱ्या संसर्गाचा धोकाही रुग्णांमध्ये आढळून आलेला नाही.

गावकऱ्यांनी सरपंच केलं, उच्चशिक्षित सरपंचाच्या शेतात जादूटोणा, खिळे-टाचण्या-लिंबूची होळी करत म्हणाले…

सध्या मुंबईमध्ये प्रत्येक महिन्याला साधारण एक हजार चाचण्या घेतल्या जात आहे. त्यात सर्वाधिक आरटी-पीसीआर चाचण्या करण्यावर भर देण्यात आला असून खासगी रुग्णालयांमध्ये अधिक चाचण्या होत आहत. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात येणार आहे. श्वसनाच्या आजारासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे करोना संसर्गाच्या बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

गंभीर परिस्थिती उद्भवल्यास सुसज्जता

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकारचा रुग्ण सिंधुदुर्गामध्ये आढळल्याने राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पालिका रुग्णालयांमध्ये औषधे, मास्क, पीपीई किट, खाटा, अतिदक्षता विभागातील खाटा, विलगीकरण खाटा, दोनशेपेक्षा जास्त तपासणी किट, कस्तुरबा रुग्णालयात २२५० आरटी-पीसीआर चाचणीचे किट आणि सेल्फ टेस्टिंगच्या किटचीही पुरेशी उपलब्धता असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या मालकानं मटणाचं ६१ लाख रुपयांचं बिल थकवलं, प्रकरण पोलिसांत

जिनोम सीक्वेन्सिंगवर भर

मुंबईमध्ये करोना चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचसह या चाचण्यांचे जे अहवाल पॉझिटिव्ह येतील त्या रुग्णांची जिनोम सीक्वेन्सिंग चाचणीही करण्यात येणार आहे. सध्या पालिकेने ढोबळरित्या घेतलेल्या नमुन्यांपैकी ज्या चाचण्या पॉझिटिव्ह आहेत त्यांचे जिनोम सीक्वेन्सिंग करण्यात येणार आहे. सध्या या चाचण्या एनआयव्हीला पाठवण्यात येत आहेत. मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयाकडे ही सुविधा असली तरीही त्यामध्ये जिनोम सीक्वेन्सिंग करण्यासाठी निश्चित निदान नमुन्यांची उपलब्धता नाही. रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने या चाचण्या करण्यात येत नाहीत. त्यामुळे या चाचण्या पुण्याला एनआयव्हीकडे पाठवण्यात येणार आहेत.

मास्क बंधनकारक नाही

मास्क आवश्यकतेनुसार वापरावा, असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात येतात. मात्र सामान्यांनी स्वेच्छेने, आवश्यकता असेल तिथेच मास्क वापरावा. त्यासाठी कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

संतापजनक! कर्णबधीर मुलीवर आईच्या प्रियकरासह तीन नराधमांचा लैंगिक अत्याचार, पुणे हादरलं

उपलब्ध खाटांची संख्या

प्रकार/पालिका रुग्णालये/सेव्हन हिल रुग्णालय

खाटा/३२९५/१८५०

विलगीकरण खाटा/१२७६/९१०

प्राणवायू खाटा/११०८/६२०

अतिदक्षता विभागातील खाटा/४४१/३२०

जीवनरक्षक प्रणालीच्या खाटा/४७०/३६०

कोरोनाच्या नव्या जेएन-१ व्हेरियंट धास्ती वाढली; मुख्यमंत्री शिंदेंकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.