Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कांदा शेतकऱ्यांना का रडवतो?, कांद्याचा नेमका वांधा काय? निर्यातबंदीस विरोध का? जाणून घ्या सविस्तर…

8

नाशिक : अल्प पाणी आणि अल्प कालावधीत फायदा मिळवून देणारे नगदी पीक म्हणून कांद्याची ओळख आहे. असे असले तरीही महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाचे असणारे हे पीक कृषी-अर्थ आणि राजकारण अशा अनेक अंगांनी काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कांदा पिकासाठी अनिश्चित असा भाव. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी अशा अस्मानी संकटांपासून तर कधी शासनाची अनिश्चित धोरणे व व्यापाऱ्यांवरील अवलंबित्त्व याचा फटका सातत्याने सर्वस्व पणाला लावून कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसतो. कांदा हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील पीक बनले आहे.

निर्यातबंदीस विरोध का?

– दरवाढ नियंत्रित करून कांद्याची देशांतर्गत उपलब्धता व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून निर्यातबंदी

– निर्यातबंदीमुळे कांद्याच्या विपणानास केवळ देशांतर्गत बाजारपेठ उपलब्धता

– देशांतर्गत पुरवठा जास्त अन् मागणी कमी, असा निर्यातबंदीनंतर परिणाम

– मागणीत घट झाल्याने कांद्याचे दरात अचानक घसरण

– उत्पादनास येणारा खर्चही या भावातून मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे

– दर घसरतात तेव्हा उत्पादकांना अर्थसहाय्य किंवा निश्चित हमीभाव देणारे सरकारचे धोरण नाही

– कांदा पीक घेताना मेहनत, गुंतवणूक, संसाधने, जमीन या सर्व बाबतीत सरकारचे कुठलेच सहाय्य नसते
‘दुर्दैवाने संजूला…’ वनडे मालिका जिंकल्यानंतर कर्णधार राहुल काय म्हणाला? सॅमसनबद्दल केले वक्तव्य
…म्हणून होतो दरात चढ-उतार

– कांदा उत्पादकांमध्ये प्रामुख्याने लाल, उन्हाळी व रांगडा अशा तीन प्रकारचे उत्पादक

– जून-जुलैमध्ये खरीप कांद्याची लागवड होऊन तो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विक्रीला येतो

– ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लागवड होणारा रांगडा कांदा डिसेंबर-जानेवारीमध्ये विक्रीस उपलब्ध

– ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लागवड झालेला उन्हाळ कांदा फेब्रुवारी-मार्च-एप्रिलमध्ये विक्रीस येतो

– कांद्याच्या एकूण लागवडीचे क्षेत्र आणि संभाव्य उत्पादन यावर दरांचा अंदाज येतो

– कांद्याच्या आयात-निर्यातीची धोरणे आणि दरवाढ स्थिरीकरण योजनेसारख्या निर्णयांचा अंमल दरांवर पडतो

– वातावरणाच्या लहरीपणाचा फटकाही कांद्याच्या भावास बसतो

– दुष्काळी स्थिती, खराब हवामान व सरकारची धरसोड धोरणे यामुळे किमती अस्थिर राहतात

देशातील कांदा पिकविणारे राज्य : २६

– देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्रातील उत्पादन : ३० टक्के

– निर्यातीत भारताच्या कांद्याला चवीमुळे चीन व पाकिस्तानपेक्षा जादा दर : किमान ३० डॉलर

– महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादन (राज्यात ४० टक्के वाटा)

महाराष्ट्रातील कांदा उत्पादनाची आकडेवारी

– २०२१-२२ मधील उत्पादन : १३६ लाख टन

– २०२२-२३ मधील उत्पादन : १२० लाख २३ हजार टन

– खरीप हंगामातील उत्पादन : २७.२४ लाख टन

– रब्बी हंगामातील उत्पादन : २७.५५ लाख टन

निर्यातबंदी करण्यामागची कारणे

– कमी पावसामुळे कांदा उत्पादनात घट

– महानगरांमध्ये कांद्याचे दर ७० रुपये किलो

– ४ नोव्हेंबरच्या घाऊक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार कांदा दरवाढीचा वार्षिक दर सातत्याने वाढत ६२.६० टक्क्यांवर

– आगामी निवडणुकांचाही केंद्र सरकारकडून विचार

नाफेडची कांदा खरेदी न परवडणारी

– नाफेडकडून केवळ चांगल्या दर्जाच्याच कांद्याची खरेदी केली जाते

– कमी दर्जाचा कांदा बाजार समितीत विकणे शेतकऱ्यांना भाग पडते

– सरसकट कांदा खरेदी होत नसल्याले नाफेडला कांदा विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही

दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान; लवकरच निघणार शासन निर्णय; राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.