Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘नाताळ’ नेमका का साजरा केला जातो माहितीय? मग ही खास गोष्ट जरूर वाचा

6

Christmas Marathi Nibandh : आपल्या भारत देशामध्ये विविध जाती आणि धर्माचे लोक एकजुटीने राहतात, त्यामुळे भारताला सर्वधर्म समभाव असलेला देश म्हणून संबोधले जाते. प्रत्येक धर्मातील सण, उत्सव, संस्कृती, परंपरा वेगवेगळ्या असतात. ‘विविधतेत एकता असणार्‍या आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माचे लोक आपापले सण मोठ्या उत्सहाने साजरा करतात आणि देशभरातील लोक हे हे सणही मोठ्या उत्साहात व एकोप्याने साजरे करतात. ‘नाताळ’ म्हणजेच ‘क्रिस्टमस’ हा त्या सणांपैकी ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण.

भारतातच नव्हे तर, परदेशातही इंग्रजी भाषिक देशामधील लोक हा सण साजरा करतात. दरवर्षी हा सण २५ डिसेंबरला साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण देणारे येशू हे ख्रिस्ति धर्माचे संस्थापक मानले जातात. येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला.

ख्रिसमसचा शब्दश: अर्थ आहे ‘क्राइस्ट्स मास (Christ’s Mass)’ अर्थात येशुच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. ख्रिस्ती लोकांसाठी हा सण आनंदाचा आणि हर्षाचा सण आहे, जशी पौर्णिमा व अमावस्या या तिथी जश्या चंद्रावर अवलंबून असतात. तसा प्रकार ख्रिस्ति कालगणनेत नाही, ख्रिस्ति कालगणेत सूर्याला अधिक महत्व दिले जाते.

Christmas Day : २५ डिसेंबरला ‘ख्रिसमस’ म्हणून का साजरा केला जातो? जाणून घेऊया कारण आणि इतिहास
ख्रिस्ति धर्माचे लोक या सणाची तयारी १० दिवस अगोदर पासूनच सुरु करतात, बाजारातून नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी तसेच आपल्या घरातील साफसफाई करणे, आणि गोड पदार्थ बनवण्यास सुरु करतात. २४ डिसेंबरच्या रात्रीपासून येशूची प्रार्थना करण्यास सुरवात केली जाते. २५ डिसेंबर ला येशूचा जन्म दिवस साजरा केला जातो.जीझस ईश्वराचे पुत्र असल्याची श्रद्धा आहे. या दिवशी गिरिजाघरात प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करतात. शिवाय, नाताळच्या दिवशी सर्व ख्रिस्ति धर्माचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्च मध्ये जातात, आणि या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्याची गळा भेट घेऊन शुभेच्या देतात.

या दिवशी चर्च आणि दुकाने तसेच आपली घरे सुंदर रोषणाई सजविले जातात, ख्रिसमस ट्री उभारून त्यास सजविले जाते. ख्रिसमस ट्री हे मंगल कामनेचे प्रतीक मानले जाते, नाताळचा दिवशी मध्यरात्री Santa हा लहान मुलास भेट वस्तू देतो असा समज आहे. सांता क्लॉज़ हि काल्पनिक वक्तिरेखा असून त्याला मराठी नाताळबाबा असे म्हटले जाते. सांता क्लॉज़ हे नाताळ या सणाचे प्रमुख वैशिट्य आहे. या दिवशी काही भाविक उपवास करतात आणि सणानिमित्त घरोघरी केक चॉकलेट, बिस्कीट असे पदार्थ बनविले जातात.

देशातील आदिवासी आणि खेड्या पाड्‍यांमधील ख्रिस्ती बांधव थोड्या वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. या लोकांच खानपान या दिवशी वेगळ असते. तांदुळाच्या रव्या पासून बनविलेली केक व केळी या गोष्टींचा समावेश त्यांच्या जेवणाचा एक महत्वपूर्ण भाग असतो. तर, दक्षिण भारताच्या काही भागात पायसम हा गोड पदार्थ बनवून हा दिवस साजरा केला जातो. परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशु‍द्धीचे कारण असतो. म्हणून, ‘रोमन कॅथोलिक्स संप्रदायाचे लोक १ डिसेंबरपासून २५ डिसेंबरपर्यंत फक्त शाकाहारी भोजनाचे सेवन करतात.

अशा पद्धतीने पदतीने नाताळ हा सण सगळीकडे अत्यंत उत्साहाने व आनंदमय साजरा केला जातो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.