Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

28

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय…

वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण रान पेटवायला कंबर कसून उभे होते, त्यात निसर्गही आघाडीवरच होता. भयंकर अशा दुष्काळाच्या परिस्थितीत महाराजांचा जन्म झाला. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संकटांच्या या मालिकाच मालिका होत्या. अशा परिस्थितीत महाराजांनी गनिमी काव्याच्या युद्ध प्रणालीच्या आधारे आपल्या बहुतांशी मोहीमा फत्ते केल्या. यात प्रामुख्याने प्रतापगड युद्ध, लालमहालावरील छापा, सुरतेची मोहीम, आग्रा भेट दक्षिण दिग्विजय अशा अनेक मोहीमा आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. या व अशा अनेक लहान-मोठ्या मोहीमांमध्ये महाराजांची सरशी झाली. त्या मोहीमांचा पाठीचा कणा म्हणजे ज्याला आपण आत्ता बोली भाषेत back bone म्हणतो, ते म्हणजे गुप्तहेर खाते !!!
शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनाची जी घडी बसवली होती, त्यात या खात्याचा प्रामुख्याने उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.आणि यांच  गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक

आपल्या कुशल युद्धनितीने अत्यंत नियोजनबध्द डाव मांडून महाराजांनी मोहीम फत्ते केली. आग्रा भेट, प्रतापगड, लालमहाल अशा महत्वाच्या मोहीमांमध्ये मोलाची कामगिरी पार पाडली ती गुप्तहेर खात्याने. स्वराज्याच्या उभारणीत / पायाभरणीत एक महत्वाचा चिरा बनून राहिलेले गुप्तहेर खाते हे जसे महत्वाचे तसेच अंतर्गत प्रशासनात देखील त्याची अत्यंत आवश्यकता असते.
आता तीच रेषा पुढे मोठी करण्याची मोहीम / कामगिरी वर्धा पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांनी हातात घेतली आहे. फक्त यात बदल केला तो तंत्रज्ञानाचा ! तो अपेक्षितच आहे.  उच्चशिक्षित असलेले श्नी नूरुल हसन व त्यांना साथ देणारा अधिकारी वर्ग आणि कुशल कर्मचारी वर्ग यांच्या सहाय्याने वर्धा जिल्हा पोलिस दल कात टाकतांना दिसतय व आपल्या दैनंदिन कामकाजात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलिस म्हटलं की, आपल्या समोर जे चित्र उभे राहते ते म्हणजे नेहमी सिग्नलच्या चौकात उभा राहणारा, रात्रीच्या वेळी गस्त घालणारा, आपले सणवार, मंगलकार्ये सोडून इतरांच्या आनंदासाठी धडपडणारा, उन-वारा-पाऊस या कशाचीही तमा न बाळगणारा, स्वतःच्या व परिवाराच्या इच्छा आकांक्षाना तिलांजली देणारा खाकी वर्दीतील माणूस. पोलिस, तो सुध्दा खाकी वर्दीतील माणूसच आहे. आपले कर्तव्य पार पाडत असताना त्याला अनेक लहान-मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मग ती समस्या कोणतीही असो, कार्यालयीन कामकाजाची जागा असो, राहण्याची जागा असो, कर्तव्य बजावण्याची जागा असो, आपत्कालीन प्रसंगी स्वतःच्या जीवावर उदार होऊन कर्तव्य पार पाडण्याचा प्रसंग असो अशा अनेक समस्यांशी तो सतत सामना करत असतो. वेळ प्रसंगी त्याला संघर्षही करावा लागतो. याच परिस्थितीचा अभ्यास करुन वर्धा पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांनी यांनी एक अभिनव कल्पना मांडली आणि ती कार्यान्वित केली ती म्हणजे ई – दरबार !

पोलिस दलात काम करत असताना पोलिसांना ज्या लहान-सहान समस्यांचा सामना करावा लागतो. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणेचा अमूल्य, वेळ वाया जातो परिणामी त्याचा परिणाम कर्तव्यावर होणे स्वाभाविकच आहे. आपली शंका, समस्या, तक्रार ईत्यादी गोष्टी आता तो आपल्या कार्यालयातूनच वरीष्ठांकडे मांडू शकतो. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळते. ई-दरबारामुळे निर्भीडपणे आपली समस्या मांडताना त्याचा मानसिक समतोल साधला जातो. कर्तव्याच्या दृष्टीकोनातून पाहायचे झाले तर रखडलेली पदोन्नती, वेतनवाढ, कामाच्या स्वरुपातील बदल अशा अनेक महत्वाच्या तक्रारींसाठी वेळोवेळी पोलिस अधिक्षक कार्यालय वा पोलिस मुख्यालयात जाऊन त्याचा पाठपुरावा करावा लागत असे. ई-दरबार प्रणालीमुळे तो कर्मचारी आता तो जिथे कर्तव्यावर आहे तिथे हजर राहूनच आपल्या वरीष्ठांशी संवाद साधू
लागला. याचा सगळ्यात मुख्य फायदा असा झाला की, वरीष्ठांचा आपल्या कर्मचाऱ्याशी वैयक्तिक संपर्क होऊ लागला. ज्याला बोली भाषेत आपण face to face किंवा personal approach / touch. म्हणतो पोलिसांना कर्तव्याशिवाय इतरही काही प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सुविधेच्या समस्या निवासाच्या जागेच्या समस्या यातील बहुतांशी समस्या या वैयक्तिक स्वरुपाच्या असल्यामुळे त्यासाठी वरीष्ठांना त्याचे निराकरण करण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालणे सहज सोपे झाले.
महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी हि ई-दरबार प्रणाली खूपच सुविधाजन्य झाली. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांना घर आणि ऑफीस या दोन्ही आघाड्यांवर अग्रेसर बनूनच काम / कर्तव्य करावे लागते. दोन्ही ठिकाणी मातृशक्तिचा कस लागतो. या प्रणालीमुळे त्या आता दोन्ही ठिकाणी आपला जास्तीचा वेळ देऊन आपले काम पूर्ण करु शकतात. या ई-दरबार प्रणालीमुळे पोलिस अधीक्षक नूरुल हसन स्वतः व संबंधित इतर सर्व खात्यांचे अधिकारी/कर्मचारी  या दरबारात उपस्थित असल्यामुळे समोरासमोर समस्या सोडविणे सुकर होऊ लागले. सरकारी खात्यात जसं म्हटले जातं की फाईल या टेबल वरुन त्या टेबलवर हे न होता जबाबदार अधिकारी समोरच असल्यामुळे तिथल्यातिथं जागेवरच समस्यांचे निराकरण होऊ लागले. या ई-दरबार प्रणालीमुळे पोलिस कर्मचारी वृंदामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात
विश्वासाचे नाते अधिक बळकट झाले.

या ई- दरबार प्रणाली मधे दिवसानिहाय बरेच बदल होतील त्यासंबंबधी संकेतस्थळ व यांचे ॲप तयार करण्याचा पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचा मानस आहे

Leave A Reply

Your email address will not be published.