Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुडन्यूज! अपघात टाळणारे ‘कवच’ जूनअखेर मुंबई-दिल्ली मार्गावर, कवच कसे काम करते? जाणून घ्या

8

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी सज्ज होत असतानाच मुंबई ते रतलामदरम्यान ‘कवच’ अर्थात स्वयंचलित रेल्वेसुरक्षा कार्यान्वित करण्यात आली आहे. जून २०२४अखेर संपूर्ण मार्गावर ही यंत्रणा सुरू होणार आहे.

रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टाळण्यासाठी स्वदेशी बनावटीची ‘कवच’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीत या यंत्रणेमुळे रेल्वेगाड्यांचे ब्रेक स्वयंचलित कार्यान्वित होऊन त्यामुळे अपघात टाळणे शक्य होणार आहे.

‘कवच’ची सद्यस्थिती

– पश्चिम रेल्वेने २०२२मध्ये ९० रेल्वे इंजिनसह ७३५ किमीवर ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

– विरार-सूरत-वडोदरा विभागात ३३६ किमी, वडोदरा-अहमदाबाद विभागात ९६ किमी आणि वडोदरा-रतलाम-नागदामध्ये ३०३ किमीवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

– विरार-नागदादरम्यान १४३ किमीवर ‘कवच’ कार्यान्वित करण्यात आले आहे.

– १५ जानेवारीपर्यंत आणखी १०० किमी आणि संपूर्ण मार्गावर जून २०२४अखेर ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.

– सध्या ९०पैकी एकूण ३४ रेल्वे इंजिनवर ‘कवच’ कार्यान्वित आहे.

दिल्ली मेट्रो खासगीकरणाच्या मार्गावर सुपरफास्ट, लवकरच दोन मार्गीकांचे संचालन खासगी कंपन्यांकडे
असे करते ‘कवच’ काम

– रेल्वेच्या रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) ‘कवच’ संरक्षण यंत्रणा विकसित केली आहे.

– रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मार्च २०२२मध्ये सिकंदराबाद येथे कवच कार्यप्रणालीची चाचणी करण्यात आली.

– चाचणी यशस्वी झाल्यानंतर तिची भारतीय रेल्वेत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अग्निशमन दलाचे जवान रांगत-रांगत वर पोहोचले, समोर कोळसा झालेले सहा मृतदेह अन् कुत्रा

– इंजिनच्या लोको पायलटने सिग्नल ओलांडला, अतिवेगाने गाडी चालवल्यास ती कार्यान्वित होते.

– अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये (यूएचएफ) रेडिओ कम्युनिकेशनचा वापर यात केला जातो.

– ही इंटरलॉकिंगसह विद्यमान सिग्नल यंत्रणेला जोडली जाते.

– स्थानक उपकरणांसह रुळांच्या बाजूला लागणाऱ्या उपकरणांसाठी अंदाजे ५० लाख आणि इंजिनसाठी अंदाजे ७० लाख खर्च येतो.

महिला सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचं मोठं पाऊल, भायखळा स्टेशनवर पॅनिक बटन कार्यान्वित

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.