Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘पीएसएलव्ही सी-५८’च्या प्रक्षेपणाचे काउंटडाउन रविवारी सकाळी सुरू झाले. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोमवारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांनी रॉकेटचे प्रक्षेपण होईल. उड्डाणानंतर २२ मिनिटांनी प्रक्षेपणातील मुख्य उपग्रह असलेल्या ‘एक्स्पोसॅट’ला जमिनीपासून ६५० किलोमीटरच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. त्यानंतर ‘पोएम’चा समावेश असलेल्या ‘पीएसएलव्ही’च्या चौथ्या टप्प्याला जमिनीपासून ३५० किलोमीटरपर्यंत खाली आणण्यात येईल.
उपग्रहाला अवकाशात सोडल्यानंतर या आधी ‘पीएसएलव्ही’चा चौथा टप्पा अवकाशातील कचऱ्याच्या स्वरूपात पृथ्वीभोवती फिरत राहत असे. मात्र, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) या टप्प्याला प्रयोगांसाठीचे व्यासपीठ म्हणून विकसित केले. ‘पोएम’चे हे तिसरे उड्डाण असून, त्यावर ‘इस्रो’सह खासगी कंपन्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या एकूण दहा प्रयोग बसवण्यात आले आहेत.
‘बिलीफसॅट ० हा जगभरातील हॅम रेडिओ वापरकर्त्यांसाठीचा उपग्रह आहे. जमिनीवरून आलेले विशिष्ट फ्रीक्वेन्सीमधील रेडिओ संदेश ग्रहण करून ते पुन्हा वेगळ्या फ्रीक्वेन्सीमध्ये प्रक्षेपित करण्याचे काम ‘बिलीफसॅट झिरो’ करेल. विद्यार्थ्यांना आणि हौशी रेडिओ वापरकर्त्यांना विशिष्ट सॉफ्टवेअर वापरून सॅटेलाइटकडून प्रक्षेपित होणारी माहिती मोफत मिळवता येईल. अधिक क्लिष्ट तंत्रज्ञान असलेल्या बिलीफसॅटच्या पुढील आवृत्याही येत्या दोन वर्षांत प्रक्षेपित होतील.
‘पोएम’मध्ये समावेश असलेले प्रयोग
डस्ट एक्सप्रिमेंट (फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी), फ्युएल सेल पॉवर सिस्टीम आणि सिलिकॉन बेस्ड हाय एनर्जी सेल (विक्रम साराभाई अवकाश केंद्र- इस्रो), रेडिएशन शील्डिंग एक्सप्रिमेंट मॉड्यूल (टेक मी २ स्पेस), वुमन इंजिनीअर्ड सॅटेलाइट (एलबीएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमन), बिलीफसॅट झिरो (केजेएसआयटी), ग्रीन इम्पल्स ट्रान्समीटर (इन्स्पेसिटी स्पेस लॅब्स), लाँचिंग एक्सपेडिशन्स फॉर ऍस्पायरिंग टेक्नॉलॉजीज (ध्रुवा स्पेस), रुद्रा ०.३ एचपीजीपी आणि अर्क २०० (बेलॅट्रिक्स एअरोस्पेस)