Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतीय हवाई दलात सामील होण्याची सुवर्णसंधी, १२ वी पास उमेदवार करू शकणार अर्ज

9

Indian Airforce Agniveer Vayu Recruitment 2024: भारतीय वायुसेनेमध्ये सामील होण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झालई आहे. अग्निवीर एअर भरती अंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्जाची लिंक अद्याप सक्रिय झालेली नाही. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या रिक्त जागांसाठी फॉर्म भरायचा आहे ते अर्जाची ऑनलाइन लिंक सक्रिय झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरू शकतात. १७ जानेवारी २०२४ पासून ही लिंक सक्रिय असून उमेदवारांना ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. रिक्त पदांची नेमकी संख्या अद्याप सांगता येणार नाही परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे ३५०० पदांवर भरती केली जाऊ शकते.

ऑनलाइन अर्ज :

भारतीय वायुसेनेच्या अग्निवीर एअर रिक्रूटमेंट २०२४ साठी अर्ज फक्त ऑनलाइन केले जाऊ शकतात. हे अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना agneepathvayu.cdac.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवार या भारतीचा तपशील जाणून घेऊन, अर्ज देखील करू शकता.

अर्ज करण्यास हे उमेदवार पात्र :

  • अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांमध्ये किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शिवाय, एकूण ५०% गुण आणि इंग्रजीत ५०% गुण असणे आवश्यक आहे.
  • सदर पात्रता निक्षण हे विज्ञान शाखेतील आणि विज्ञानेतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठीही लागू आहे.

भारतीय हवाई दलात सामील व्हायचय, चांगला स्कोअर आवश्यक.. जाणून घ्या AFCAT 2024 परीक्षेविषयी
वयोमर्यादा :

वयोमर्यादेबाबत बोलायचे झाले तर उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००४ ते २ जुलै २००७ दरम्यान झालेला असावा.
यासोबतच, उमेदवाराने निवडीचे सर्व टप्पे पार केल्यास, नावनोंदणीच्या वेळी त्याचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अशी पार पडेल निवड प्रक्रिया :

० पहिला टप्पा आणि दुसरा टप्प्यातील परीक्षांनंतर, या दोन्ही टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

० परीक्षेच्या या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नंतर शारीरिक तंदुरुस्ती (Physical Fitness) चाचणी किंवा वैद्यकीय चाचणीसाठी (Medical Test) बोलावले जाईल.
अर्ज शुल्काविषयी :

सदर भरती प्रक्रिया आणि परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज शुल्क भरणे अनिवारी असेल. यासाठी उमेदवारांना ५५० रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. हे पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग इत्यादीद्वारे केले जाईल.
महत्त्वाच्या लिंक्स :

Indian Airforce Agniveer Vayu Recruitment 2024 ची मूळ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.