Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

टेड्रिंग मार्केटिंगमध्ये नफ्याचे आमिष, डॉक्टरला तब्बल ५७ लाखांचा गंडा, सायबर चोरट्यांनी ‘असे’ फसवले

10

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ट्रेडिंग मार्केटिंगमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल. असे आमिष दाखवून बीड शहरातील एका डॉक्टराला सायबर चोरांनी तब्बल ५७ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकूण तीन जणांच्या विरोधात बीड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या डॉक्टराचे नाव डॉ. विठ्ठल क्षीरसागर आहे.

या प्रकरणी डॉ. विठ्ठल सोनाजीराव क्षीरसागर (वय ५७, रा. नगर रोड, बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे केएसके कॉलेज रोड येथे केसोना अॅक्सिडेंट हॉस्पिटल आहे. नोव्हेंबर २०२३मध्ये पहिल्या आठवड्यात मोबाइलवर सोशल मार्केटिंग साइट ते होते. एक सोशल नेटवर्किंग साइट दिसून आली. त्याला डॉ. विठ्ठल सोनाजी क्षीरसागर यांनी रिप्लाय केला. या साइटवरून एक टेलिग्राम आयडी आला. त्यावरून या अर्पिता मोनिका (बेंगळुरू) यांनी चॅटिंगवरून फॉरेस्ट ट्रेडिंगमध्ये मार्केटिंगबाबत विचारणा केली. त्यांनी starbannerglobal.com ही लिंक (वेबसाइट) आणि टेलिग्रामवर @star_Banner_CustomerService_16 या लिंकवर नोंदणी करून पैसे भरण्यासाठी सांगितले. या लिंकमध्ये डॉ. विठ्ठल क्षीरसागर यांनी आपली माहिती भरली.

मुंबईत आठ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल, यंत्रणांमध्ये खळबळ, मग…

डॉ. विठ्ठल क्षीरसागर यांनी ही लिंक ओपन करून ४० हजार रुपयांचा भरणा केला. यानंतर १५ नोव्हेंबर २०२३ ला डॉ. क्षीरसागर यांच्या खात्यात ४५ हजार २०० रुपये आले. यानंतर १६ नोव्हेंबरला ट्रेंडिंगमध्ये दहा लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. डॉ. क्षीरसागर यांनी दहा लाख रुपये गुंतवले. १६ नोव्हेंबर ते एक डिसेंबर या काळात डॉ. क्षीरसागर यांनी ट्रेडिंगसाठी ५७ लाख २० हजार रुपये गुंतवले. सदर गुंतवणुकीनंतर पैसे परत मिळाले नाहीत. या प्रकरणी बीड सायबर पोलिस ठाण्यात हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संतोष साबळे करीत आहेत.

टॅक्ससाठी ३६ लाख भरा

डॉ. विठ्ठल क्षीरसागर यांनी ट्रेंडींगच्या नावाखाली वेळोवेळी पैसे भरले. ऑनलाईन पैसे ट्रान्सफरसह रोख रक्कमही भरली. ४ डिसेंबर रोजी फसवणूक करणाऱ्यांनी डॉ. विठ्ठल क्षीरसागर यांना तुमचा नफा १,५०,८२९ डॉलर इतका आहे. तुम्हाला टॅक्स पोटी ४५००० हजार डॉलर भरावे लागणार आहे. ही किंमत भारतीय चलनात ३६ लाख रुपये इतकी आहे. हे पैसे भरले तरच तुम्हाला तुमचा नफा मिळेल, असेही सायबर चोरांकडून सांगण्यात आले.

वेगवेगळ्या खात्यावर भरले पैसे

सायबर चोरांनी डॉ. विठ्ठल क्षीरसागर यांना त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम मिळविण्यासाठी नऊ खात्यांवर पैसे पाठविण्याचे सांगितले. डॉ. विठ्ठल क्षीरसागर यांनीही कधी रोख रक्कम, तर कधी आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे पाठविल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

डिपफेक व्हिडीओचा वाढता धोका; सायबर तज्ञांकडून ऐका ‘डीपफेक’च्या धोक्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.