Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १७ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजी नगर / औरंगाबाद भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी (मातृत्व विभाग) – ०३ जागा
वैद्यकीय अधिकारी (अंश-वेळ) – ०४ जागा
एपिडेमियोलॉजिस्ट – ०१ जागा
मायक्रोबायोलॉजिस्ट – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०९ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार एमबीबीएस किंवा वैद्यकीय पदवीधर असावा. याबाबत पदनिहाय विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन –
वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह) – ६० हजार
वैद्यकीय अधिकारी (अंश-वेळ) – ३० हजार
एपिडेमियोलॉजिस्ट – ३५ हजार
मायक्रोबायोलॉजिस्ट – ७५ हजार
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मार्केल बील्डींग, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १७ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.