Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नुकतीच याबाबत ‘महावितरण’ने जाहिरात प्रसिद्ध केली असून या भरतीद्वारे एकूण २४६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया ११ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. तर २५ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर भारती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
आयटीआय अप्रेंटीस – २१० जागा
पदवीधर अप्रेंटीस – ३६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २४६ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित ट्रेड मधील आयटीआय किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवीधर असावा. (I.T.I./Degree/ Diploma)
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – ११ जानेवारी २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ‘ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा. ( ११ जानेवारी २०२४ पासून)
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
विशेष सूचना – ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची आणि प्रत आणि आवश्यक कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार (मानव संसाधन आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जाभवन, चंद्रपूर )संबधित पत्यावर प्रत्यक्ष सादर करायचे आहे.