Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कृषी संशोधन केंद्राला ‘कोरड’; पालिकेने १० दिवसांपासून थांबवला पाणीपुरवठा

7

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

पुणे
: राज्य सरकारने ‘जैवविविधता वारसा स्थळाचा’ मान दिलेल्या गणेशखिंड कृषी व फळसंशोधन केंद्राला सध्या पाण्याअभावी ‘कोरड’ पडली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता महापालिकेने गेल्या १० दिवसांपासून पाणीपुर‌वठा थांबविल्याने दुर्मीळ वनस्पतींचे नुकसान टाळण्यासाठी संस्थेला टँकर बोलावून तहान भागविण्याची वेळ आली आहे. पालिकेकडून वारंवार पाणीपुरवठा का तोडला जातो, याचा प्रश्न केंद्र प्रशासनाला पडला आहे.

पुण्याच्या नावलौकिकात भर पाडणाऱ्या जुन्या ऐतिहासिक संशोधन संस्थांमध्ये राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी व फळ संशोधन केंद्राचा उल्लेख केला जातो. पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूस ५६ हेक्टर जागेत विस्तारलेले हे वनस्पतीशास्त्र उद्यान म्हणजे चालतीबोलती प्रयोगशाळा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले ‘गणेश डाळींब’ असो, की लोकप्रिय झालेला ‘सरदार पेरू’… विषाणूजन्य प्रतिकाकारक्षम विमुक्ता भेंडी किंवा डाएटप्रेमींची गणेश ब्रोकली… असे अनेक उत्पादनक्षम वाण पुण्यातील गणेशखिंड फळ संशोधनाच्या बागेतून नावारूपाला आले आहेत.

विभागीय कृषी संशोधन केंद्राला काही महिन्यांपूर्वी महापालिकेने सहा वर्षांपूर्वीपासून थकीत पाणीपट्टी भरण्याचे पत्र पाठवले होते. केंद्राने डिसेंबर अखेरीस सात लाख ५० हजार रुपये प्रलंबित रक्कम भरणे अपेक्षित होते. केंद्राने मुदतीपूर्वीच सर्व रक्कम जमा केली. त्यानंतरही महापालिकेने पाणीपुरवठा थांबविला. केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपट्टी भरल्याने निदर्शनास आणून दिल्यावर पुन्हा पाणी सुरू झाले. मात्र, २९ डिसेंबरपासून परत एकदा पाणीपुरवठा थांबवला असून, तो अजून सुरू झालेला नाही.

संस्थेत संशोधनासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. माळी प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांचा अभ्यासवर्ग सुरू आहे. ३३ निवासस्थाने असून, तेथे कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. नवीन वर्षाची सुरुवात होतानाच पाणीपुरवठा खंडित झाल्याने संस्थेतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. पाण्याची समस्या तातडीने दूर करावी, असे पत्र घेऊन केंद्राचे कर्मचारी सध्या महापालिकेकडे फेऱ्या मारीत आहेत.

पुणे महापालिकेने दिलेल्या पाणीपट्टी बिलाची सर्व रक्कम आम्ही २० डिसेंबरपूर्वीच जमा केली आहे. त्यानंतर पालिकेने पाणीपुरवठा थांबवला. कर्मचाऱ्यांनी चौकशी केल्यावर काही दिवस पाणी सुरू झाले होते. आता पुन्हा पाणीपुर‌वठा बंद केला आहे. आमचे कर्मचारी, विद्यार्थ्यांची गैरसोय पाहून अखेर एका स्वयंसेवी संस्थेने आम्हाला टँकरने पाणी उपलब्ध करून दिले.

– डॉ. रवींद्र बनसोड, सहयोगी संशोधक संचालक, विभागीय कृषी व फळ संशोधन केंद्र

पेशवेकालीन बागेमुळे ऐतिहासिक महत्त्व

पेशव्यांच्या काळात १७९६ ते १८१८च्या दरम्यान गणेशखिंडीतील या बागेची निर्मिती झाली. त्याची साक्ष देणारे, खुद्द बाजीराव पेशवे यांनी लावलेले २२३ वर्षे जुने ‘पेशवा’ हे आंब्याचे झाड अजूनही उद्यानात दिमाखात उभे आहे. पेशवाई संपल्यानंतर १८७३मध्ये प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ जी. एम. वुडो यांनी उद्यानाची शास्त्रीय मांडणी केली. पुढे १८७८-७९मध्ये बागेला मुंबई राज्यातील ‘मुख्य वनस्पतीशास्त्रीय उद्यान’ म्हणून मान्यता मिळाली.

गणेशखिंड कृषी संशोधन केंद्राकडून आम्हाला या संदर्भात पत्र मिळाले आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पाणीपुरवठा खंडित कसा झाला, याची चौकशी करणार आहे. लवकरात लवकर ही समस्या सोडविणार आहोत.

– नंदकुमार जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

महापालिकेला हवी केंद्रातील जागा

पुणे महापालिकेने २००९मध्ये प्रस्ताव देऊन विभागीय कृषी संशोधन केंद्राकडून सांगवी ते बोपोडी रस्त्यासाठी १७५ गुंठे जागा ताब्यात घेतली होती. यासाठी महापालिकेने जमिनीचा मोबदला आणि संस्थेच्या इमारतीच्या डागडुजीचे काम पूर्ण करण्याची अट घातली होती. मात्र, महापालिकेने आश्वासनांची पूर्तता केली नाही. यानंतर पेशव्यांच्या बागेलगतची अजून २५ गुंठे जागा इतर कामासाठी घेतली. आता पुन्हा एकदा एका मोठ्या प्रकल्पासाठी महापालिकेला दुर्मीळ वृक्ष असलेल्या भागातील ३० गुंठे जागा हवी आहे. मात्र, विद्यापीठाने वनस्पती वैभवाच्या जतनासाठी या प्रस्तावाला नकार कळवला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.