Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गोव्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी येथे भरती; आजच अर्ज करा

11

NIO Goa Recruitment 2024: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. गोवा येथील युनिटसाठी ही भरती होणार असून याद्वारे प्रोजेक्ट असोसिएट -I, आणि प्रोजेक्ट असोसिएट – II या पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून २१ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
प्रोजेक्ट असोसिएट -I – ०२ जागा
प्रोजेक्ट असोसिएट – II – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात ‘एमएससी’ उत्तीर्ण असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन – (मासिक)
प्रोजेक्ट असोसिएट – I – २५ हजार
प्रोजेक्ट असोसिएट – II – ३० हजार

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेल द्वारे

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता – hrdg@nio.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन म्हणजेच ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २१ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.