Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ऋषिकेशच्या यशामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पुढील महिन्यात तो प्रथम वर्ग सरकारी अधिकारी म्हणून रूजू होईल. ऋषिकेश सध्या मुंबईत असून, पुढील आठवड्यात रत्नागिरीत येणार आहे. पटवर्धन हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर ऋषिकेशने फिनोलेक्स अकॅडमी या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्समधून अभियांत्रिकीचे शिक्षण २०१४ मध्ये पूर्ण केले. त्यानंतर काही काळ नोकरीसुद्धा केली; परंतु चार वर्षात नोकरी सोडून एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्याने २०२२ पर्यंत कसोशीने अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण होत हे मोठे यश मिळवले आहे.
अभ्यास आणि मार्गदर्शन या संबंधी विचारले असता ऋषिकेश म्हणाला, मी फार कोणत्या क्लासला जात नव्हतो. घरीच अभ्यास करत होतो. दिलीप काटेकर यांच्याकडे एका विषयासाठी मार्गदर्शन घेतले. सुरुवातीला दिवसाला ४ तास व पुढे पुढे १२ तासांपर्यंत अभ्यास करत होतो. पुस्तके वाचनावर भर दिला. परीक्षेच्या काळात १० ते १२ तास अभ्यास व्हायचा. या परीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागतो; पण मी स्मार्टस्टडीवर भर दिला. परीक्षा कशी असते, त्यानुसार अभ्यास केला. पहिल्या परीक्षांतील चुकांतून शिकलो. काहीवेळा अपयशही आले. काही चुका पुन्हा पुन्हा झाल्या पण त्या सुधारत पुढे चाललो. करोना काळात थोडा खंड पडला. आरोग्य, घरगुती विषय, कौटुंबिक व आर्थिक विषय सांभाळत अभ्यास केला आणि यश मिळाले.
नियुक्तीसंदर्भात ऋषिकेश म्हणाला, प्रथम वर्ग अधिकारी या पदासाठी संधी मिळेल. डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, सीओ, बीडीओ, असिस्टंट कमिशनर (सेल्स टॅक्स) यापैकी प्राधान्यक्रम द्यायचा असून, त्यानंतर अंतिम नियुक्ती मिळेल. आई-वडिलांची प्रेरणा, प्रोत्साहन मिळाले. मित्र, नातेवाइकांच्याही पाठबळाची भूमिका नेहमीच प्रोत्साहन देणारी ठरली.
आई वडिलांचा आनंद गगनात मावेना
आपल्या लेकाने ऋषिकेशने प्रचंड मेहनत व संयम याच्या बळावर यश मिळवले आहे. काही काळ पुण्यात व २०२० पासून तो रत्नगिरीमध्येच आहे. दररोज वाचन, अभ्यास आणि सरकारी अधिकाऱ्यांची भेट, त्यांच्याकडून टीप्स तो घेत असे. आज तो स्वतः प्रथम वर्ग अधिकारी होणार असल्याने मोठा आनंद झाला आहे,नक्कीच आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया आई सायली सावंत (शिक्षण विस्तार अधिकारी, पावस बीट) व एसटी महामंडळातून सेवानिवृत्त सहाय्यक कर्मचारी वर्ग अधिकारी असणारे वडील शेखर सावंत यांनी दिली.