Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आदर्श पतसंस्थेत नवा घोटाळा; चार कोटींचा गैरव्यवहार, शाखा व्यवस्थापकांसह १९ जणांवर गुन्हा

7

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेत पुन्हा एक घोटाळा समोर आला आहे. पतसंस्थेचे सात कर्जदाराकडून कर्जाची रक्कम बाकी असताना, गैरव्यवहार, बनवेगिरी तसेच फसवणूक करण्याच्या उद्देशाने कर्जाची रक्कम नवीन जुनी करून व्यवस्थापकासह संचालक मंडळाने कर्जदारांकडून खातेधारकांना ४ कोटी ६ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापकासह एकूण १९ जणांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात लेखापरीक्षक अमानउल्ला हामेद खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संस्थेच्या वर्ष २०२२- २३ या वर्षांसाठी पतसंस्थेचा वैधानिक लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखा परीक्षणात २०२२ ते २०२३ या दरम्यान जिल्ह्यातील मुख्यालयासह चार शाखांच्या व्यवस्थापकांमार्फत आलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत संस्थेच्या अध्यक्षांसह अन्य सात संचालकमंडळातील सात कर्जदारांकडे थकीत असताना, हे कर्ज पतसंस्थेच्या अभिलेखावर दिसू नये. यासाठी बेकायदेशीरपणे कर्जाचा भरणा दाखविण्यात आला. तसेच कर्जदाराच्या खात्यावर निरंक दाखविण्यात आली.

तसेच कर्जदार व त्यांचे जामीनदारांनी संगनमताने विनातारणी कॅश क्रेडिट कर्ज वितरण करून निधीचा अपहार केला आहे. या प्रकरणी मार्च २०२३ अखेरील आलेली सात कर्ज प्रकरणातील कागदपत्रे परिपूर्ण नसताना, कर्जाचे वाटप करून नियमांची पायमल्ली करण्यात आले अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.
बॅंक ATMवर चोरट्यांचा डोळा; तब्बल ३८ लाखांची रोकड लंपास, CCTV कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारला
या प्रकरणात कर्ज प्रकरणांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या मुख्य व्यवस्थापक अशोक मुगदळ, शाखा व्यवस्थापक जगदीश सोमनाथ कुलीअप्पा, संस्थेच्या अध्यक्षा वनिता सुनिल पाटील, संचालक सविता देविदास अधाने, रेणुका किशोर मोगल, पुष्पाताई नामदेव कुचुरे, नलिनी चंदुलाल बाहेती, सुनंदा भाऊसाहेब मोगल, सिंधु दादाराव इंगळे, वैशाली विलास चिंतामणी, शोभ शिवाजी कदम, लता अरूण टाक, शितल दिनेश चव्हाण, हारू बाई अशोक खानापुरे, राजेंद्र भिकनराव मते, कविता प्रकाश तुपे, अनिल अंबादास पाटील, सुनील अंबादास पाटील, अंबादास पाटील अशा एकूण १९ जणांच्या विरोधात चार कोटी सहा लाख २२ हजार २०५ रूपये घोटाळा प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुनहे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

असा आहे कर्जाचा तपशील

– अनिल अंबादास पाटील, सुनील पाटील, अंबादास पाटील संचालक आदर्श बिल्डर्स व डेव्हलपर्स – कर्जमंजूर व वाटप रक्कम – १८५०८०६० – बाकी रक्कम – १८२५१८१९

– अनिल अंबादास पाटील, सुनील पाटील, अंबादास पाटील संचालक आदर्श आई मिल कर्ज मंजूर व वाटप रक्कम १४९१९४० – बाकी रक्कम – १६४५२५१

– सुनील पाटील – मालक समृद्धी किराणा स्टोअर्स – कर्ज मंजूर व वाटप – ६ लाख बाकी रक्कम – ६ लाख ५७ हजार रूपये.

– अनिल अंबादास पाटील, सुनील पाटील , अंबादास पाटील – आदर्श डेअरी प्रा. लि. बाभुळगाव – कर्ज मंजूर व वाटप रक्कम – १५००००० – बाकी रक्कम – १६४३७९०

– अंबादास पाटील, संचालक आदर्श ऑटो सर्व्हिसेस कर्जखाते कर्ज मंजूर व वाटप रक्कम – २०००००० – बाकी रक्कम – १६४३७९०

– सुनील पाटील, मालक न्यू श्रीराम इलेक्ट्रीकल – कर्जमंजूर व वाटप रक्कम – २० लाख रुपये – बाकी रक्कम – २१९१७३०

– अनिल अंबादास पाटील, सुनील अंबादास पाटील, अंबादास पाटील, संचालक आदर्श ऑइल मिल – कर्जमंजूर व वाटप रक्कम – १३५०००० – बाकी रक्कम १४७९४१९

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.