Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
१९२० साली नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण आणि अवघ्या वर्षभरात या कामाचा राजीनामा; जाणून घ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खास गोष्टी
“चलो दिल्ली”, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा” अशा घोषणा देणार्या या महान नेत्याचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक (बंगाल विभाग),ओरिसा येथे प्रसिद्ध वकील जानकीनाथ आणि प्रभावती बोस यांच्या पोटी झाला.
जानकीनाथ यांच्या १४ मुलांपैकी बोस हे नववे अपत्य होते. नेताजींच्या भावंडांमध्ये आठ मुले आणि सहा मुली होत्या. राष्ट्रवादी कारवायांमुळे, १९१६ मध्ये त्यांना प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता येथून रेस्टिकेट करण्यात आले होते. पुढे त्यांनी १९१९ मध्ये स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
अभ्यासात चांगले असल्यामुळे, बोस यांना इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात भारतीय नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी पाठवण्यात आले, १९२० मध्ये सुभाषचंद्र बोस उत्तीर्ण झाले. एका वर्षानंतर, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशात स्वातंत्र्य लढा सुरू झाल्यानंतर ते भारतात परतले. नेताजींचा प्रवास सोपा नव्हता, १९२१ ते १९४१ या काळात त्यांना अनेक वेळा वेगवेगळ्या तुरुंगात तुरुंगवास भोगावा लागला.
१९२३ मध्ये ते अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले आणि नंतर १९३८ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाला विरोध केला. अत्याचार करणाऱ्यांपासून स्वातंत्र्य सहजासहजी मिळणार नाही, तर ते लढून मिळवावे लागेल, असा त्यांचा विश्वास होता.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त लाल किल्ल्यावर शौर्य दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. देशातील समृद्ध विविधता आणि विविध संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नऊ दिवसांच्या भारत पर्वचेही ते उद्घाटन करतील. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या दिग्गजांच्या योगदानाचा योग्य सन्मान करण्यासाठी पावले उचलण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, २०२१ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते.