Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बालपणीच्या मित्रांनी एक एकरात फुलवली शेती; पपईच्या लागवडीनं बदललं दोघाचं भविष्य, लाखोंची कमाई

9

अक्षय गवळी
अकोला: सद्यस्थित अधिकतर नागरिक हे शेतीवरच अवलंबून आहे. कित्येक जण अजूनही पारंपरिक पद्धतीनं शेती करत आहेत. मात्र हवं तसं उत्पन्न त्यातून भेटत नाही. त्यामुळे बदलत्या काळात पाहिजे तसा बदल झालेला दिसत नाही. परंतु अकोल्यातील दोन मित्रांनी पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत उत्तम शेती फुलवली आहे. आतापर्यत दोघांनाही प्रत्येकी ३ लाख ५० हजार रूपयांवर कमाई केली आहे. तेही फक्त एक एकर शेतीतून.

दरम्यान दोघांनी २२ हजार रुपयांची रोप आणली. लागवड अन् व्यस्थापनेसाठी लागलेला असा एकत्रित खर्च ५० हजार रूपये शेतीत गुंतवले. आता चालू वर्षात देखील प्रत्येकी एक जण शेतीतून ८ लाखांपेक्षा अधिक रूपये कमावणार आहे. ही गोष्ट आहे अकोल्यातील दोन बालपणीच्या मित्रांची. जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील देगांव येथील श्रीकृष्ण विनायक लढे आणि देगांव पासून २ किमी अंतरावरील असलेलं मानकी गाव, तेथील रहिवासी विलास आत्माराम जावरकार हे दोघेही अंत्यंत जिवलग मित्र आहेत. दोघांचं शिक्षण म्हटलं तर श्रीकृष्ण यांचं दहावी तर विलासराव यांचं बारावी पर्यतचं.
ना कोणतं मार्गदर्शन ना आर्थिक सहाय्य; सेंद्रिय पद्धतीने भाजी पिकवण्याचा निर्धार, पडीक जमिनीवर शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
दोघांचे स्वप्नही मोठ-मोठी होते. मनात काहीतरी करण्याचं धाडस होतं. परंतु पाहिजे तसे मार्गदर्शन नव्हतं. पण मागील वर्षात दोघांनाही कृषी विभागाच्या आत्मा विभागाचे मार्गदशन लाभलं अन् सर्व काही पालटलं. श्रीकृष्ण लढे आणि विलास जावरकार हे दोघेही सुरुवातीला पारंपारिक शेती करायचे. दोघांनाही हवं तसं उत्पन्न मिळत नव्हतं. मागील वर्षात विलासराव यांनी १५ एकरमध्ये सोयाबीन पीक घेतलं. पण त्यांना हातात काहीच् उरलं नाही. हिच परिस्थिती श्रीकृष्ण यांचीही. त्यानंतर दोघांनी पारंपारिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळे करायचा निर्णय घेतला.

कृषी विद्यापीठातील कृषी प्रदर्शनीला भेट दिली असता तेथे आत्माचे विजय शेगोकार यांचं मार्गदर्शन भेटलं. त्यांनी मानकी आणि देगाव परिसरातील जमिनीचा तसेच पाण्याचे नियोजन बघता फळबाग करण्यासाठी सांगितलं. यासाठी ‘पपई’ शेती हा उत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले. वर्ष २०२३.. जानेवारीच्या सुरुवातीला श्रीकृष्ण आणि विलास या दोघांनीही आपल्या प्रत्येकी एक एकर शेतीत ‘पपई’ लागवड प्रक्रिया सुरू केली. फ्रेब्रुवारी महिन्यात दोघांनी नांदुरा येथून ‘VNR शबनम’ जातीचे ‘पपई’चे दोन हजार रोपे बोलावली. एक रोप २२ रूपये, असं एकत्रित ४४ हजार रूपयांची रोपे झाली.

शेतात लागवड अन् खुद्द निर्मित केलंलं सेंद्रिय खत आणि पाण्याचे नियोजनासाठी ठिंबक सिंचन. असा प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपयांच्या जवळपास दोघांना खर्च लागला. या पपईच्या झाडांना आजवर कुठल्याही प्रकारची फवारणी तसेच इतर खर्चही लागला नसल्याचं दोघांचे म्हणणे आहे. दोघां मित्रांनी शेतीत घाम गाळला, आणि ऑगस्ट २०२३ पासून पपईचं उत्पादन त्यांना येऊ लागलं. प्रत्येकी झाडाला १०० ते १४० क्विंटल एवढं ‘पपई’चं उप्तादन झालं. या चार ते पाच महिन्यात म्हणजेच् आतापर्यत दोघांनाही प्रत्येकी ३ लाख ५० हजार रूपयांवर उत्पन्न झालं. त्यांच्या बांधावर अकोल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी भेट दिली असून त्यांच्या जिद्दीचं कौतूक केलं.

मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांसाठी डबेवाला संघटना पुढे सरसावली

विलास आणि श्रीकृष्ण हे दोघे एकमेकांना शेतातील पपई तोडण्यासाठी मदत करतात. तोडल्यानंतर प्रत्येकाच्या शेतातील पपईचं वजन मोजून घेतात. त्यानंतर पपई विकण्यासाठी स्वतः ट्रॅक्टरनं अकोला शहरात चौका चौकात उभे राहून पपईची किरकोळ पद्धतीनं विक्री करतात. ३० ते ४० रूपये प्रतिकिलोप्रमाणे पपई विकल्या जात आहे. ‘शेतकरी ते थेट ग्राहक विक्री’ या बॅनरखाली त्यांची पपई तात्काळ विकली जाते. एवढेच नव्हे तर त्यांच्या पपईला बाहेरून जिल्ह्यातून चांगली मागणी होत आहे.

विलासराव सांगतात की, एकदा पपईची लागवड केली की दोन ते अडीच वर्षे फळे मिळतात. जरी फळझाडांची पडझड झाली तरी वार्षिक उत्पादन हे ८ लाखांवर राहू शकते. तरीही २०२४ या पूर्ण वर्षात ८ लाखांच्या जवळपास कमाई करणार आहे. कारण पपई असं एक फळ आहे जे बाजारात वर्षानुवर्ष मिळते. पपईमध्ये व्हीटॅमीन सी, व्हिटॅमीन ए, प्रोटीन, कॅल्शियम, शर्करा, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतो. याशिवाय पपईत कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतोय. त्यामुळे मागणी जास्त आहे, असेही ते सांगतात. दरम्यान विलास आणि श्रीकृष्ण हे दोघेही आता पपईचे क्षेत्रफळ वाढवणार असून अडीच एकरपर्यंत नेणार असल्याचे ते सांगतात. दोघांचीही पपईच्या शेतीतून आर्थिक परिस्थिती सुधारली असून लवकर ते पुर्णता सेंद्रिय शेतीवर वळणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.