Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई,दि.२७:- दीर्घकाळापासून सुरु असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला आज यश आलेय. रात्री अकराच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ अधिकारी जरांगेच्या शिष्टाईसाठी आलं होतं.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
तब्बल अडीच ते तीन तास चर्चा करत सरकारने दिलेला अध्यादेश जरांगे पाटील आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगत होते. त्यांचा होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच आझाद मैदानात जाणार नसल्याच त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व लोक गावतील असं मोठं मैदान बघून एक तारीख जाहीर करून आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.
गेल्या दोन दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं. अखेर वाशी येथील सभेत मुख्यमत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. यावेळी गिरीश महाजन, दीपक केसरकर हेही उपस्थित होते . आज पहाटे सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगितल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर थोडा वेळ आराम केल्यानंतर मनोज जरांगे हे सभास्थळी निघाले. वाटेत हजारो मराठा बांधवाचे अभिनंदन करत, त्यांचे आशिर्वाद घेत मनोज जरांगेंचे पाऊनल पुढे पडत होते.
सभेला सुरूवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सभास्थळी येऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिभन जरांगे पाटलांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना गुलाल लावाल, नवा जीआरही सुपूर्द केला.
गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीमधून त्यांनी पायी यात्रा सुरू करत मुंबईच्या दिशेने कूच केले. त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव होते. मजल दरमजल करत ते २६ जानेवारील पहाटे वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आले. तेथे सरकारच्या शिष्ट मंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. आणि अखेर मध्यरात्रीच्या सुमारासा त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
‘मुंबईला जाणार नाही’, मनोज जरांगेंची मोठी घोषणा
भगवं वादळ हे लवकरच मुंबईत धडकणार होतं. मात्र आता हे वादळ सरकारने शांत केल्याचं दिसतंय. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, राज्य सरकारने सर्व कागदपत्रे त्यांना दिले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती देखील त्यांना करण्यात आली आहे.
या मागण्या केल्या मान्य
-ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र दिलं जावं. तसंच त्यांच्या कुटुंबांना देखील द्यावं.
-सरकारने सगा सोयराविषयी अध्यादेश काढला. तो जरांगे पाटलांना दिला.
-राज्यातील मराठी बांधवांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.
-वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमणार
-मराठवाड्यात कमी प्रमाणात पत्र सापडले. याविषयी आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करेल.
-विधानसभेमध्ये याविषयी कायदा येणार.