Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी केली अटक…
नाशिक (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी योग्य ती खबरदारी म्हणून उपनगर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. या वेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या तीन आरोपींना अटक करून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त परिमंडळ-२, श्रीम. मोनिका राउत, सहा. पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ.सचिन बारी यांनी नाशिक शहरातील गुंड प्रवृत्तीच्या व दहशत पसरवणा-या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत वारंवार सुचना देवून व मार्गदर्शन केले होते.
तेव्हा वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे तसेच पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलिस निरीक्षक गुन्हे बाबासाहेब दुकळे यांनी स्वतः उपनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत पोलिस ठाणे हद्दीतील आरोपींच्या घरी भेटी देवून तसेच उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील समतानगर झोपडपट्टी, टाकळी गाव, आम्रपाली झोपडपट्टी, रोकडोबावाडी, फर्नाडीस वाडी या भागात विशेष मोहिम राबवून उघडयावर दारू पिणारे, टवाळखोर यांच्या वर कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यानुसार (दि.२७जानेवारी) रोजी समतानगर परिसरातील आरोपींवर निर्बंध वचक आणण्याच्या व नागरिकांच्या मनात सुरक्षितता निर्माण करण्याच्या दृष्टीने सायंकाळी पायी गस्त केली. पोलिस परिणामकारक काम करत असल्याचे पाहून (दि.२८जानेवारी) रोजी रात्रगस्ती करण्याबाबत उपनगर पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोशि.जयंत शिंदे यांना उपनगर पोलिस ठाण्याचे पोहवा. गुंड यांनी इच्छामणी लॉन्स, जवळील मैदानाजवळ, नाशिक पुणे रोडवर एक इसम गावठी कट्टा व काडतूस घेवून येणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याचे सांगितले.
त्यानुसार सदर बातमीची माहिती वपोनि जितेंद्र सपकाळे यांना दिली असता त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि चौधरी, पोहवा. शेख, पोशि. जयंत शिंदे,अनिल शिंदे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलिस पथकाने दोन आरोपींना त्यांच्या ताब्यातील १ गावठी कट्टा व १ जिवंत काडतुस सह ताब्यात घेतले. सदर आरोपींना ताब्यात घेवून सपोनि चौधरी, पोहवा. लखन, पोशि. सुरज गवळी, कर्पे, राहुल जगताप, सौरभ लोंढे, संदेश रगतवान यांनी कौशल्याने कसून विचारपुस करून त्यांच्याकडून माहिती मिळवून आरोपींचा अजून एका साथीदाराला अटक करून त्याच्याकडून ०१ गावठी कट्टा व २ जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत.
या मध्ये आरोपी – १) शुभम अशोक जाधव (वय २३ वर्षे), रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, उपनगर नाशिक २) सचिन धर्मा सोनवणे (वय २४ वर्षे), रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, उपनगर नाशिक ३) गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी (वय २४ वर्षे), रा.सिध्दार्थ किराणा जवळ, समतानगर, नाशिक यांना अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त परिमंडळ-२, श्रीम. मोनिका राउत, सहा. पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि जितेंद सपकाळे, पो.निरी. बाबासो दुकळे, सपोनि चौधरी, पोहवा लखन, पोहवा इमरान शेख, पोशि.जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुरज गवळी, पंकज कर्पे, राहुल जगताप, सौरभ लोंढे, संदेश रगतवान यांनी केली असुन नमुद गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा इमरान शेख हे करीत आहेत.