Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सावधान! भारतात ३० कोटींचे बनावट HP इंक टोनर्स जप्त

8

देशात नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात ३० कोटींची बनावट HP उत्पादने जप्त करण्यात आली. भारतातील कायदा प्रवर्तन प्राधिकरणांनी HP च्या बनावट उत्पादन प्रतिबंध विभागाच्या मदतीनं ४.४ लाख अवैध उत्पादने बाजारपेठेतून काढून टाकली. या कारवाईमुळे ग्राहकांना होणारे नुकसान टळले. मुंबईत एक लाखांहून अधिक अवैध उत्पादने जप्त करण्यात आली. एचपीच्या अँटि-काउंटरफिटिंग अँड फ्रॉडच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

कुठे आणि कधी कारवाया झाल्या?

फेब्रुवारी २०२३

मुंबई– एचपी प्रिंटर्सची बनावट कार्ट्रिजेस उत्पादित करण्याचा प्रकार बंद पाडला. या कारवाईत २५ हजार अवैध उत्पादने जप्त करण्यात आली.

मार्च २०२३

दिल्ली व मुंबई – दोन छाप्यांमध्ये मिळून सुमारे १४ हजार अवैध उत्पादने जप्त केली.

एप्रिल २०२३

कोलकाता- बनावट कार्ट्रिजेससह १७ हजारांहून अधिक उत्पादने जप्त.

मे २०२३

मुंबई – एचपी प्रिंटर्सच्या बनावट मुद्रण उत्पादनाचा व्यापार करणाऱ्या दोन प्रकारांवर कारवाई. ४५ हजार बेकायदा उत्पादने जप्त.

जून/जुलै २०२३

मुंबई – एचपीची बनावट मुद्रण उत्पादने तयार करण्याची दोन ऑपरेशन्स उधळली. ९ हजारांहून अधिक उत्पादने जप्त.

ऑक्टोबर २०२३

मुंबई भागात– एचपी प्रिंटर्सची बनावट मुद्रण उत्पादने उत्पादित करण्याचा प्रकार उधळला. ११ हजार अवैध उत्पादने जप्त.

HP च्या ACF चे काम काय?

HP च्या अँटि-काउंटफीटिंग अँड फ्रॉड (ACF) कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे बनावट एचपी उत्पादनांपासून ग्राहकांचे संरक्षण करणे हे आहे. त्याचबरोबर भारतातील फसव्या मुद्रण उत्पादनांच्या पुरवठ्याचे प्रमाण आणि मागणी याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे लक्ष्यही या कार्यक्रमापुढे आहे.

काळजी घ्या!

बनावट शाई आणि टोनर कार्टरिज अगदी HP च्या अस्सल उत्पादनांसारखेच दिसू शकतात. पण, त्यांचा दर्जा निकृष्ट असतो. सुमार दर्जाचे मुद्रण, प्रिंटर डाउनटाइम आणि बनावट कार्टरिजमधील गळतीमुळे अतिरिक्त खर्च येतो. तसेच बनावट कार्टरिज बंद पडल्याने पैशाचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे उत्पादन घेताना काळजी घ्या, असा सल्ला HP कडून देण्यात आलाय.

बनावट उत्पादनापासून संरक्षण करण्यास बांधील- HP

एचपी इंडियाच्या प्रिण्टिंग सिस्टम्स विभागाचे वरिष्ठ संचालक सुनीश राघवन म्हणाले, ‘आमच्या अँटि-काउंटरफिटिंग अँड फ्रॉड कार्यक्रमाच्या माध्यमातून, भारतातील मौल्यवान ग्राहकांचे बनावट उत्पादनांपासून संरक्षण करण्यास आम्ही बांधील आहोत. ग्राहकांना एचपीची अस्सल उत्पादने प्राप्त व्हावीत, दर्जाचे मानक राखले जावेत आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण व्हावे याची काळजी हा कार्यक्रम घेतो. कस्टमर डिलिव्हरी इन्स्पेक्शनसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना त्यांच्या मुद्रण उत्पादनांची अस्सलता पडताळून बघण्यासाठी काम करतो.’

डिलिव्हरीबाबत शंका, काय करावे?

ग्राहकांना मुद्रण उत्पादनांच्या डिलिव्हरीबाबत शंका आली, तर ते मोफत तपासणीसाठी विनंती करू शकतात. एचपीच्या बनावट उत्पादन विरोधी वेबसाइटवर (hp.com/anticounterfeit) बनावट कार्ट्रिजेस घेणे कसे टाळावे, याविषयी ग्राहकांना उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.