Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१५ वर्ष पूर्ण करून देखील WhatsApp वर खूप काही आहे मिसिंग; हे फिचर असते तर वाढली असती मजा

9

२४ फेब्रुवारी २००९ रोजी Yahoo मधून बाहेर पडलेले दोन Jan Koum आणि Brian Acton यांनी WhatsApp या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली होती. आयओएस, अँड्रॉइड आणि ब्लॅकबेरी ओएसवरील युजर्सना एकमेकांना इन्स्टंट मेसेज करण्याची सोय करणं हा या अ‍ॅपचा उद्देश होता. २०१४ मध्ये Mark Zuckerberg च्या Meta कंपनीनं हे अ‍ॅप्लिकेशन सुमारे १९ बिलियन डॉलरमध्ये खरेदी केलं.

यंदा व्हॉट्सअ‍ॅपला १५ वर्ष पूर्ण होत आहेत, जगभरातील सुमारे २ अब्ज युजर्स दर महिन्याला व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. फक्त टेक्स्ट मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात केलेल्या या अ‍ॅपवर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. परंतु अजूनही काही छोटे फिचर मिसिंग वाटतात, चला त्यांची यादी पाहू.
हे देखील वाचा: ९९ टक्के लोकांना माहीतच नाहीत WhatsApp वरील या ट्रिक्स; हटके पद्धतीनं मेसेज फॉरमॅट करून दाखवा तुमची स्टाइल

मेसेज शेड्यूलिंग

मेसेज शेड्यूलिंग फिचरच्या मदतीनं युजर्स ठराविक तारीख किंवा वेळेवर मेसेज पाठवू शकतील, जरी ते ऑनलाइन नसतील. त्यामुळे तुम्ही वेळेवर रिमायंडर देऊ शकता आणि रात्री १२ पर्यंत न जागता बर्थडे आणि अ‍ॅनिवर्सरी मेसेज पाठवू शकता. सध्या यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅप्स आहेत परंतु व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हे फिचर असल्यास काम आणखी सोपं झालं असतं.

अनावश्यक “This Message Was Deleted” चा अलर्ट

जो मेसेज पाठवायचा नाही तो पाठवणे खूप लाजिरवाणे आहे. तो मेसेज डिलीट करण्याची सोय तर व्हॉट्सअ‍ॅपने केली आहे परंतु तुम्ही मेसेज डिलीट केला हा अलर्ट मात्र समोरच्या व्यक्तीला जातोच. त्यामुळे या फिचरचा उद्देशच सार्थ होत नाही. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त “unsend” बटन असावं.

अनोळखी लोकांचे मेसेज रोखता यावे

ज्यांच्याकडे तुमचा नंबर आहे, मग ती व्यक्ती कोणीही असो तुम्हाला मेसेज करू शकते. यामुळे स्पॅम आणि त्रास वाढतो. इंस्टाग्राम प्रमाणे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह नसलेल्या लोकांचे मेसेज रिक्वेस्ट स्वरूपात यावे. त्यामुळे प्रायव्हसी वाढेल.

कॉन्टॅक्ट ग्रुप

मित्र, नातेवाईक, सहकर्मचारी असे ग्रुप बनवता आले तर खूप बरं होईल. यामुळे तुम्ही शेअर करत असलेले स्टेट्स, फॉरवर्ड करत असलेले मेसेजेस काही ठराविक लोकांपर्यंतच पोहचवता येतील. यामुळे वर्क लाइफ साधण्यास नक्की मदत होईल.

स्टेट्सवर लाइक बटन

फक्त व्युव्हज पेक्षा एक फीडबॅक बटन व्हॉट्सअ‍ॅपनं द्यावं. यामुळे फक्त स्टेट्स पाहणं आणि रिप्लाय देऊन रिअ‍ॅक्ट होणं या दोन टोकाच्या फीडबॅकच्या मध्ये एक पर्याय मिळेल. काहींना हे फिचर आवडणार नाही परंतु अनेकांना हे फिचर नक्की हवं आहे.

स्टेट्स अपडेटमध्ये म्युजिक

सध्या युजर्स स्टेट्स अपडेटमध्ये म्युजिक जोडू शकत नाहीत, यासाठी त्यांना थर्ड पार्टी अ‍ॅप्सची मदत घ्यावी लागते. मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर या फिचरची आवश्यकता नाही, परंतु स्टेट्स अपलोड करण्याचं फिचर आहेच ना? मग ते खुलवण्यासाठी या फिचरची मदत होईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.