Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सौर वादळाचा वर्तविला अंदाज
संबंधित अंदाजकर्त्यांनी अलीकडेच सौर वादळाच्या धोक्याबद्दलचा तपशील उघड केला आहे. त्यानुसार येत्या 2 मार्च रोजी CME भूचुंबकीय वादळ निर्माण करू शकते. भूचुंबकीय वादळ स्पेस वेदरच्या अहवालानुसार, नॅशनल ओशियानिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या अंदाजकर्त्यांनी काल सनस्पॉट AR3592 च्या उद्रेकानंतर अंतराळात फेकलेल्या CME वर प्रकाश टाकला आहे. हे CME 2 मार्च रोजी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्राला घासून जाईल आणि G1-वर्ग भूचुंबकीय वादळ निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.
अशी होते भूचुंबकीय वादळांची निर्मिती
नासाच्या म्हणण्यानुसार, भूचुंबकीय वादळ हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा एक मोठा अडथळा आहे जो पृथ्वीच्या वरच्या जागेत सौर वाऱ्यापासून ऊर्जेची तीव्र देवाणघेवाण होत असताना निर्माण होतो. सौर वादळाने बाहेर पडलेल्या उच्च-गती सौर ज्वाला पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राशी संवाद साधतात आणि भूचुंबकीय वादळांच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.
काय आहे भूचुंबकीय वादळांचा धोका
G1-वर्ग भूचुंबकीय वादळे ही किरकोळ वादळे मानली जातात आणि त्यामुळे सामान्यतः जास्त नुकसान होत नाही. अशी चुंबकीय वादळे मोबाइल नेटवर्कवर परिणाम करण्यासाठी किंवा उपग्रहांना नुकसान पोहोचवण्याइतपत स्ट्रॉंग नसतात. परंतु तरीही ते रेडिओ ब्लॅकआउट आणि GPS सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतात. तथापि, भूचुंबकीय वादळांमुळे ध्रुवीय प्रदेशांजवळ दिसणाऱ्या प्रकाशाच्या निळ्या-हिरव्या रंगछटा, अरोरा तयार होतात.
परंतु , जर भूचुंबकीय वादळ पुरेसे स्ट्रॉंग असेल तर ते फक्त औरोरापेक्षा जास्त नुकसान करू शकते. ते लहान उपग्रहांचे नुकसान करू शकतात, मोबाइल नेटवर्क आणि GPS वर परिणाम करू शकतात आणि चुंबकीय क्षमता प्रचंड प्रमाणात वाढवून जमिनीवर आधारित इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर ग्रिडला धोका निर्माण करू शकतात.