Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 4 मार्च 2024: कार्यालयात वादाची शक्यता…या राशींनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा ! पाहा राशिभविष्य
मेष आर्थिक राशिभविष्य : राजकीय सहकार्य लाभेल
मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि रोजगारासंबंधित सुरू असलेल्या प्रयत्नांना फळ मिळेल. काम जास्त असेल पण त्यामुळे कुटुंबाकडे दुलर्क्ष करू नका. कोणत्याही वादात अडकू नका. तुम्हाला प्रत्येक पातळीवर राजकीय सहकार्य मिळेल. आरोग्यबद्दल उदासीन राहू नका. भाषेवर संयम ठेवा. विरोधक पराजित होतील. आज पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
PC:freepik.com
वृषभ आर्थिक राशिफल : कार्यालयात वादाची शक्यता
वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस यशाचा आहे. धन, पद, प्रतिष्ठा यात वृद्धी होईल. कार्यालयात कोणाशी तरी वाद होऊ शकतो. अशा स्थितीत स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करून अनावश्यक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावे. परीक्षेच्या दिशेने केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. विरोधक काहीही करू शकणार नाहीत.
PC:freepik.com
मिथुन आर्थिक राशिभविष्य : वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा
मिथुन राशीच्या लोकांना भाग्याती वृद्धी होईल आणि तुमचे अकडलेले पैसे पतर मिळतील. धन आणि ऐश्वर्य यात वृद्धी झाल्याने तुमच्या शत्रूंना त्रास होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहील. शासन, सत्ता यांचे सहकार्य मिळेल. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम मार्गी लागेल, त्यामुळे आनंद होईल. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याचा धोका आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा.
PC:freepik.com
कर्क आर्थिक राशिभविष्य : विरोधक निष्प्रभ होतील
कर्क राशीच्या लोकांना करिअर आणि व्यापाराच्या संदर्भात नशिबाची साथ मिळेल. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. प्रकृतीबद्दल सावध राहा. कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मनोरंजनाची संधी मिळतील. विरोधक निष्प्रभ होतील आणि तुमची धनवृद्धी होईल. योजना यशस्वी होतील.
PC:freepik.com
सिंह आर्थिक राशिफल : वादात पडू नका.
सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यवृद्धीचा दिवस आहे, आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची वृद्धी होईल. तुमच्या हाताखालील कर्मचारी आणि नातेवाईक तणावाचे कारण ठरतील. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा. सासरच्या बाजूने लाभ होतील. वाहन प्रयोग करताना सावध राहा, आणि कोणाशी वादात पडू नका.
PC:freepik.com
कन्या आर्थिक राशिभविष्य : सासरच्या बाजूने लाभ
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या विचारमंथनात जाईल आणि कामात मन लागणार नाही. आर्थिक बाबतीत अपयश येईल. तुमची वाणी सौम्य आहे त्यामुळे प्रतिष्ठेत वाढ होईल आणि तुम्हाला करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. सासरच्या बाजूने लाभ होईल. आजच्या दिवशी कोणाशीही देवाणघेवाण करू नका.
PC:freepik.com
तूळ आर्थिक राशिभविष्य : पराक्रमात वृद्धी
तूळ राशीच्या लोकांना आज लाभ होईल, तसेच आज तुमचा पुरुषार्थ आणि पराक्रम यात वृद्धी होईल. ज्यांना रोजगार नाही, अशांना आज रोजगार मिळेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. सासरच्या पक्षाकडून लाभ होईल. वादापासून स्वतःला दूर ठेवा. आज शेअर बाजारात गुंतवणूक करू नका, तसेच प्रॉपर्टीसंदर्भातही कोणता विचार करू नका.
PC:freepik.com
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : विरोधकांचा पराभव
वृश्चिक राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल. व्यावसायाच्या दृष्टीने आज यश मिळेल. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. अनावश्यक खर्चाला तोंड द्यावे लागेल. विरोधकांचा पराभव होईल. रोजगारसंदर्भात यश मिळेल. पैशाशी संबंधित विषयांत लाभ होईल आणि नशिबाची साथ मिळेल.
PC:freepik.com
धनू आर्थिक राशिभविष्य : व्यावसायिक निर्णय नको
धनू राशीच्या लोकांना आज एखाद्या प्रकरणात नुकसान होऊ शकते. चुकूनसुद्धा आज कोणाशीही आर्थिक देवाणघेवाण करू नका. गुप्तशत्रू आणि ईर्षेखोर लोकांपासून सावध राहा. आर्थिक दिशेत यश मिळेल. तुमचे बोलणे सौम्य आहे, त्यामुळे प्रतिष्ठेत वृद्धी होईल. प्रकृतीच्या बाबतीत सावध राहा. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. सासरच्या बाजूने लाभ होईल. आज व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका.
PC:freepik.com
मकर आर्थिक राशिफल : प्रवास सुखाचा
मकर राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या धन, मानसन्मात वृद्धी होईल. विवेकपूर्ण कामामुळे रोजगाराच्या दिशेने यश मिळेल. आज भेटवस्तू आणि मानसन्मान यांचा लाभ होईल. दुसऱ्यांचे सहकार्य मिळवण्यात यश मिळेल. प्रवास सुखद आणि लाभप्रद होईल. प्रियजनांची भेट संभवते. आज पैशाच्या देवाणघेवाणींचे व्यवहार कोणाशीही करू नका, विश्वासघात होऊ शकतो.
PC:freepik.com
कुंभ आर्थिक राशिफल : धनवृद्धी होणार
कुंभ राशीसाठी आज धनवृद्धी होईल. राजकीय दिशेने तुम्ही केलेले प्रयत्नांना फळ मिळेल. शासन आणि सत्तेचे सहकार्य मिळेल. पद आणि प्रतिष्ठेत वृद्धी होईल. एखादा जवळचा मित्र भेटेल. उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवा. वायफळ खर्च करू नका आणि कोणलाही फुकटचा सल्ला देऊ नका. आज मकरेचा चंद्र तुमचा जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाचे योग प्रबळ करत आहे.
PC:freepik.com
मीन आर्थिक राशिफल : कुटुंबीयांची मदत मिळेल
मीन राशीच्या लोकांसाठी धनवृद्धी होईल. आजचा दिवस विजयाचा कारक आहे. जुन्या वादविवादापासून मुक्ती मिळेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. भेटवस्तू आणि सन्मानाचा लाभ होईल. एखादे कार्य पूर्ण झाल्याने तुमचा स्वभाव आणि वर्चस्व यात वृद्धी होईल. सासरच्या बाजूने तणाव राहील. मैत्रीसंबध मधुर राहतील. कुटुंबातील सदस्यांची प्रत्येक बाबतीत मदत मिळेल.
PC:freepik.com