Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रसिद्धीसाठी ‘TikTok’ शोधत आहे नवीन मार्ग
‘TikTok’ हे जगभरात खूप लोकप्रिय ॲप आहे. मात्र भारतात या ॲपवर बंदी घातल्यानंतर ॲप अनेक नवीन मार्ग शोधत आहे. खरं तर, चीनी कंपनी पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.
इन्स्ट्राग्राम सारखेच फीचर
तत्सम फीचर्स तुम्हाला इन्स्टाग्रामवर देखील दिलेले आहेत. आता ‘TikTok’ देखील अशाच ॲपवर काम करत आहे. यावर तुम्ही फक्त फोटो शेअर करू शकाल. पण एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे ॲप TikTok च्या मुख्य ॲपशीही जोडले जाईल. तुम्हाला फक्त मुख्य ॲपवर सूचना मिळणार आहेत. केवळ त्याच्या मदतीने युजर्स एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतील.
वाढली मेटा आणि इंस्टाग्रामची चिंता
अहवालात म्हटले आहे की, टिकटॉकला इंस्टाग्रामशी स्पर्धा करायची आहे, म्हणून हे ॲप लॉन्च केले गेले आहे. फोटो ॲपबाबत टिकटॉक ॲपमध्ये काही कोड आढळले आहेत. यानंतरच कंपनी नवीन ॲप लाँच करण्याच्या विचारात असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच नवीन ॲपमध्ये तुम्हाला पूर्णपणे नवीन फीचर्स मिळणार आहेत. यानंतर मेटा आणि इंस्टाग्रामची चिंता वाढली आहे. पण यूजर्सला एक नवा पर्याय मिळणार आहे.
भारतातल्या लाँचिंग बद्दल स्पष्टता नाही
टिकटॉककडून मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर कंपनीकडून लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते. मात्र भारतात लॉन्च होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण TikTok वरील कारवाईनंतर भारतात ॲपवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून हे ॲप भारतात काम करत नाही.
अमेरिका लादू शकते ‘TikTok’ वर बंदी
यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने नुकतेच एक विधेयक मंजूर केले जे ‘TikTok’ ला त्याच्या चिनी मालकापासून वेगळे होणे किंवा अमेरिकेतून बंदी घालणे यापैकी एक निवडण्यास भाग पाडते. 352 खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर विरोधात फक्त 65 मते पडली. हा कायदा व्हिडिओ शेअरिंग ॲपसाठी मोठा धक्का ठरू शकतो. कनिष्ठ सभागृहात मंजूर झाल्यानंतर आता या विधेयकावर सिनेटमध्ये मतदान व्हायचे आहे. 170 दशलक्ष अमेरिकन युजर्स असलेल्या ‘TikTok’ ॲपवर आता सिनेट निर्णय घेईल. विधेयकात असे म्हटले आहे की, ‘TikTok’ ची मूळ कंपनी ‘ByteDance’ 180 दिवसांच्या आत (सहा महिन्यांत) विकली जाणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास अमेरिकेत ॲपल आणि गुगल ॲप स्टोअरवर बंदी घालण्यात येईल.
“प्रोटेक्टिंग अमेरिकन्स फ्रॉम फॉरेन एनीमी कंट्रोल्ड ऍप्लिकेशन्स ऍक्ट” अंतर्गत हि बंदी घालण्यात येणार आहे.
भारतातही ‘TikTok’ वर याआधीच बंदी
‘TikTok’ वर भारतात आधीच बंदी घालण्यात आली आहे. भारताने 2020 मध्येच ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ टिकटॉकवर बंदी घातली होती. असे करणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत एक होता. बंदीच्या वेळी, भारतात सुमारे 150 दशलक्ष मासिक ॲक्टिव्ह युजर्स होते. भारतापाठोपाठ नेपाळनेही ‘सामाजिक सौहार्दा’च्या नकारात्मक प्रयत्नांचा हवाला देत चीनच्या मालकीच्या टिकटॉकवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. भारत आणि नेपाळनंतर ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, अफगाणिस्तान, डेन्मार्क, नेदरलँड, न्यूझीलंड आणि नॉर्वेनेही टिकटॉकवर बंदी घातली आहे. जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये TikTok वर बंदी आहे.