Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 21 मार्च 2024 : या राशींसाठी आळस सोडा, कामाला लागा ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य

10

मेष – प्रगतीचा दिवस

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते. स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामात जास्त लक्ष दिल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमच्या मेहनतीने कामाच्या ठिकाणी चांगले स्थान निर्माण कराल. काही नवीन संपर्कांमुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवासाला जाताना वाहन जपून चालवणे आवश्यक आहे, नाहीतर काहीतरी संकट ओढवू शकते.
PC:freepik.com

वृषभ – नातेवाईकांबद्दल आकस ठेवू नका

वृषभ - नातेवाईकांबद्दल आकस ठेवू नका

आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी देण्याघेण्याच्या व्यवहारात काही समस्या घेऊन येणार आहे. तुम्ही मनात तुमच्या नातेवाईकांबद्दल कोणत्याही प्रकारचा आकस ठेवू नका. तुमच्या वाढत्या खर्चाबद्दल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करू शकता. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर ते संवादाच्या माध्यमातून दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या काही जुन्या चुकांमुळे तुम्हाला भीती वाटण्याची शक्यता आहे. तुमच्या घरात पाहुणे आल्याने तुम्ही आनंदी व्हाल.
PC:freepik.com

मिथुन – जोखीम उचलणे टाळा

मिथुन – जोखीम उचलणे टाळा

मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक फळे मिळणार आहेत. एखाद्या कामात जोखीम उचलणे टाळावे लागेल. व्यावसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर राहणार असला तरीही ते त्यावर सहज मात करण्यात यशस्वी व्हाल. काही कामांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमची कीर्ती वाढल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी काही यश मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
PC:freepik.com

कर्क – तीर्थयात्रेची तयारी कराल

कर्क - तीर्थयात्रेची तयारी कराल

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. आज तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची तयारी करू शकता. तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगली फळे मिळतील. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्हाला समाधान वाटेल. तुमच्या मनात चाललेल्या गोष्टी तुम्हाला वरिष्ठ सदस्यांकडे व्यक्त कराव्या लागतील, तरच तुम्ही त्यावर उपाय शोधू शकाल. प्रेम जीवनातील लोक त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावाचा स्वीकार झाल्याने आनंदी होतील.आळस झटकून कामाला लागणे योग्य आहे.
PC:freepik.com

सिंह – नाव कमवाल

सिंह – नाव कमवाल

सिंह राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी अभ्यास आणि अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हावे यामुळे तुमचे नाव सर्वतोमुखी होईल. धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनात तुमचे नाव सर्वश्रुत होईल. नशिबाच्या जोरावर चांगले नाव कमावण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या भावा-बहिणींसोबतही तुमचे चांगले जमेल. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्ही काही दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही अडथळे असतील तर त्यापासून तुम्हाला सुटका मिळेल.
PC:freepik.com

कन्या – भावना व्यक्त करू नका

कन्या – भावना व्यक्त करू नका

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुमच्या भावना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे बोलून दाखवू नका. एखाद्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला काही अडचण येत असेल तर ती आज सोडवली जाण्याची शक्यता आहे. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल. सध्या सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तो मोठ्या आजाराचे रूप धारण करू शकतो. जर तुम्ही एखाद्याचा सल्ला पाळलात तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
PC:freepik.com

तूळ – कुटुंबात शुभकार्य होईल

तूळ – कुटुंबात शुभकार्य होईल

आजच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांना जमीन – जुमल्या संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल. तुमच्या जवळच्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. कौटुंबिक जीवनात सतत होणारी भांडणे आणि समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवण्याचा विचार करू शकता. कुटुंबात काही शुभ कार्य होत असल्याने कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या घरी येणे जाणे सुरू राहील. तुमची स्थिरतेची भावना प्रबळ होईल. तुमच्या चातुर्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या काही विरोधकांना गप्प करण्यात यशस्वी व्हाल.
PC:freepik.com

वृश्चिक – व्यवसायात भागीदारी टाळा

वृश्चिक – व्यवसायात भागीदारी टाळा

नोकरीशी संबंधित वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणाशीही भागीदारी करणे टाळावे. तुमच्या व्यवहाराबाबत लोकांसमोर तुमचे मत स्पष्टपणे मांडा, नाहीतर त्यांच्याकडून तुमचे मोठे नुकसान होण्याची पूर्ण शक्यता आहे. सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला राहील. तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते देखील करू शकता. तुमचं तुमच्या आईशी काही कारणावरून वाद होऊ शकतात.
PC:freepik.com

धनू – परीक्षेत यश मिळेल

धनू – परीक्षेत यश मिळेल

आज धनु राशीच्या लोकांमध्ये खूप उर्जा असेल. एखाद्या परीक्षेत यश मिळाल्यावर विद्यार्थ्यांना आनंद होईल. तुमची महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर त्याला उशीर होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल, नाहीतर कोणी व्यक्ती तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकेल. अभ्यास आणि अध्यात्मात तुमची आवड वाढेल. तुमचे खर्चही वाढल्याने तुमच्यासाठी डोकेदुखीही वाढेल.
PC:freepik.com

मकर – घाईघाईने निर्णय घेणे टाळा

मकर - घाईघाईने निर्णय घेणे टाळा

आजच्या दिवशी मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आज घाईघाईने निर्णय घेणे टाळावे लागेल, नाहीतर समस्या उद्भवू शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. आज नवीन लोकसंपर्काच्या माध्यमाशी तुम्ही जोडले जाण्याची संधी मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्याकडून काही मागितल्यास तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात एखाद्या बाबतीत यश मिळाल्यास तुम्ही आनंदी व्हाल.
PC:freepik.com

कुंभ – आळस झटका

कुंभ – आळस झटका

आज कुंभ राशीचे लोक काही महत्त्वाची कामे करतील. आज आळस झटकून स्वत:ला पुढील कामांसाठी तयार करावे लागेल, नाहीतर काही समस्या उद्भवू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपल्या कामात गती ठेवावी, नाहीतर काही अडचणी येऊ शकतात. भावांसोबत सुरू असलेल्या वादातून सुटका होईल. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल. मालमत्तेशी संबंधित एखाद्या प्रकरणातील विवादात तुम्हाला काही समस्या येत असतील, तर त्यातूनही तुम्हाला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
PC:freepik.com

मीन – मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल

मीन - मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल

मीन राशीच्या मंडळींच्या कुटुंबात आज आनंद नांदणार आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. तुमची मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकेल आणि तुमचे राहणीमान सुधारेल. तुम्हाला तुमच्या मूल्यांवर आणि परंपरांकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी काही योजना करूनच पुढे जावे, नाहीतर समस्या उद्भवू शकतात. तुमचा एखादा मित्र तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव घेऊन येऊ शकतो.
PC:freepik.com

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.