Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विनापरवाना अवैधरीत्या बायोडीजलची विक्री करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हे दाखल; 31 हजार लिटर साठा जप्त…
बुलढाणा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय तथा राज्य महामार्गालगत राजरोसपणे अवैध बायोडिझेलची सर्रास विक्री होत होती. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिस विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 31 हजार लिटर इंधन साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सुनील कडासने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे,चिखली ‘एमआयडीसी’, मलकापूर व दसारखेड एमआयडीसी येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 31 हजार 405 लिटर अवैध बायोडिझेल सह एकूण 34 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2024 च्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या बायोडीजल व्यावसायीकांवर धडक कारवाई करणेबाबत पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, यांनी आदेशीत केले होते. सदर संबंधाने पोनि. अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विवीध स्वतंत्र पथके तयार करुन, नमुद पथकांना जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे लगत अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या बायोडीजल व्यावसायीकांची गोपनीय माहिती काढून, त्यांचेवर कठोर कायदेशीरपणे कारवाई करणे संबंधाने सूचना दिलेल्या होत्या.
सदर संबंधाने (दि.31 मार्च) रोजी पोलिस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबवून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पो.स्टे. चिखली, पो.स्टे. मलकापूर ग्रामीण आणि पो.स्टे. एम.आय.डी.सी. मलकापूर या क्षेत्रातील अवैध बायोडीजल विक्री करणाऱ्या व्यवसायीकांवर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये
आरोपी नामे – 1) सचिन रामकृष्ण लोखंडे (वय 42 वर्षे) रा. चिखली, 2) ज्ञानेश्वर सारजुबा काठोळे रा.खैरव ता.चिखली 3) नफीस खान नासीर खान (वय 27वर्षे) रा.वडनेर भोलजी ता.नांदूरा, 4) हेमंत काचकुरे (वय 24 वर्षे) रा.तालसवाडा ता.मलकापूर, 5) परमेश्वर कैलास वनारे रा.माकनेर, ता.मलकापूर, 6) शेख जावेद शेख सलीम (वय 34 वर्षे) रा.मलकापूर, 7) शेख जायेब शेख रशीद रा.मलकापूर, 8) मो.जिया मो.युसूफ (वय 43 वर्षे),रा.मलकापूर, 9) गुरफान खान गफार खार (वय 35 वर्षे) रा.मलकापूर या सर्व आरोपींना अटक करून यांच्याकडून एकूण 31,405 लिटर बायोडीजल किं. 23,25,715 रुपयांसह गुन्ह्यात वापरलेला ईतर मुद्देमाल किं.10,94,570/- रु.असा एकूण 34,20.295/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी विरुध्द संबंधीत पोलिस स्टेशनला भादंविचे 285 सह 3,7 अत्यावश्यक वस्तु कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधीक्षक यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात, अपर पोलिस अधिक्षक,खामगाव बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे-प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. यांचे नेतृत्वात, सपोनि. विलासकुमार सानप, आशिष चेचरे स्थागुशा बुलढाणा, सपोनि श्रीधर गुट्टे पारपत्र विभाग, पो.अ. कार्यालय बुलढाणा, पोउपनि.श्रीकांत जिंदवामर, सचिन कानडे, रवि मोरे, तसेच पोलीस अंमलदार गुन्हे शाखा-बुलढाणा यांच्या पथकाने पार पाडली आहे.