Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Google New Find My Device
Android च्या ऑफिशियल एक्स अकाऊंटवरून ट्वीट करून या नवीन Find My Device ची माहिती देण्यात आली आहे. ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे की नवीन फाईंड माय डिवाइस अॅप जगभरातील अँड्रॉइड डिवाइसेसवर रोल आउट होण्यास सुरुवात झाली आहे. एक अब्जापेक्षा जास्त डिवाइसेसच्या क्राउडसोर्स्ड नेटवर्कसह फाईंड माय डिवाइस तुमचा हरवलेला डिवाइस आणि दैनंदिन जीवनातील वस्तू लवकर आणि सुरक्षितपणे शोधण्यास मदत करेल.
मोठा बदल
फाईंड माय डिव्हाइसमध्ये झालेल्या खास बदलांपैकी एक असा आहे की Google नं अँड्रॉइड ९.० किंवा त्यावरील व्हर्जनवर चालणाऱ्या एक अब्जापेक्षा जास्तीचे डिवाइसचा “क्राउडसोर्स्ड नेटवर्क” बनवण्यात आला आहे. हे नेटवर्क ठराविक रेंजमध्ये असल्यास तुमच्या फोन किंवा टॅबलेटला पिंग करू शकतं. आतापर्यंत फाईंड माय डिवाइस फक्त वाय-फाय किंवा सेल्युलर नेटवर्कवर इंटरनेटशी जोडलेल्या अँड्रॉइड डिवाइसवर चालत होतं. आता ही टेक्नॉलॉजी डिवाइसचं रियल टाइम लोकेशन दाखवण्यासाठी जवळच्या इलेक्ट्रॉनिक्सचा ब्लूटूथ सिग्नल देखील टॅप करू शकते.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर अॅप्पलच्या फाईंड माय प्रमाणे अपडेटेड Find My Device नेटवर्क क्राउडसोर्स्ड लोकेशन डेटाच्या माध्यमातून डिवाइस ट्रॅक करण्यासाठी ब्लूटूथ सिग्नलचा वापर करेल. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमचा अँड्रॉइड फोन हरवला तर आजूबाजूचे अँड्रॉइड डिवाइस इंटरनेट कनेक्शनविना देखील तो फोन शोधून देतील.
ही सुविधा सध्या अँड्रॉइड ९ पाय डिवाइस आणि Google Play Services इंस्टॉल करण्यात आलेल्या नवीन डिव्हाइसवर उपलब्ध आहे. तसेच, Google नुसार निवडक डिवाइस जसे की पिक्सल ८/८ प्रो बंद झाल्यावर देखील शोधता येतील.