Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
इंस्टाग्रामवर व्होट स्टिकर
इंस्टाग्रामवर व्होट स्टिकर स्टोरीजमध्ये करता येत आहे. परंतु या स्टिकरचा वापर तुमच्या पोस्ट मध्ये कसा करायचा हे देखील आपण पाहणार आहोत.
- सर्वप्रथम इंस्टाग्राम अॅप ओपन करा.
- होम पेजवर वरच्या बाजूला डावीकडे असलेल्या ‘Your Story” आयकॉनवरील ‘+’ वर क्लिक करा.
- किंवा तुम्ही खालच्या बाजूला असलेल्या टॅब मधून ‘+’ निवडून ‘Story’ वर देखील क्लिक करू शकता.
- आता तुमच्या फोनच्या गॅलरीमधील फोटो दिसू लागतील, त्यातील जो फोटो अपलोड करायचा आहे तो निवडा.
- वरच्या बाजूला स्टिकर आयकॉन दिसेल त्यावर टॅप करा.
- स्टिकर्सच्या यादीत ‘Vote’ स्टिकर दिसेल त्यावर टॅप करा.
- तुमच्या आवडीनुसार त्याची जागा आणि आकार सेट करा.
- त्यानंतर ‘Your stories’ वर टॅप करून अपलोड करा.
या स्टिकर्ससह अपलोड झालेल्या स्टोरीज इंस्टाग्राम सर्वांना दिसण्यासाठी सर्वप्रथम दाखवत आहे. त्यामुळे तुमचे तुमच्या स्टोरीज तुमच्या फॉलोवर्सना नक्की दिसतील.
व्होट स्टिकर पोस्टमध्ये वापरण्यासाठी
वरील स्टेप्स फॉलो करून घ्या परंतु स्टोरी अपलोड करू नका. ती स्टोरी व्होट स्टिकरसह सेव्ह करून घ्या. नंतर इंस्टग्राम पोस्ट करायला घ्या तिथे सेव्ह केलेली इमेज दिसेल ती तुम्ही पोस्ट करू शकता.
निवडणूक आयोगाचा इंस्टाग्रामवर मेसेज
मतदारांना जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोगाचा एक मेसेज इंस्टाग्रामवर दिसत आहे. या मेसेज सोबत एक लिंक जोडण्यात आली आहे, जी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर घेऊन जाते. या वेबसाइटवर निवडणुकीची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की “भारतीय लोकसभा निवडणूक २०२४ संबंधित अधिकृत माहिती मिळवा आणि तुमच्या राज्यातील लोक कधी मतदान करू शकतात ते जाणून घ्या,” सोबत ‘Try Election Stickers’ लिंक देखील जोडण्यात आली आहे.