Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवले असेल तर त्यांना कोण थांबवणार?’

18

हायलाइट्स:

  • संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
  • चंद्रकांत पाटील- किरीट सोमय्यांवर टीका
  • पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यावरही भाष्य

मुंबईः ‘चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार (Ajit Pawar) खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) फिरतात. हे विधान गमतीचेच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या ७२ तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तिथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?, असा मिश्किल सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केला आहे. तसंच, चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवलेच असेल तर त्यांना कोण थांबवणार?,’ असंही राऊतांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा भाजप व महाविकास आघाडी यांच्यात सामना रंगला आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तर, चंद्रकांत पाटील यांनीही आघाडीवर निशाणा साधला आहे. यावर आजच्या सामनाच्या रोखठोक सदरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच, महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा ही लोकशाहीची धोक्याची घंटा ठरत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असं मला वाटतं,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

वाचाः शेजारच्या तरुणासोबत चॅटिंग केल्याचा संशय; दिराने केला भावजयीचा खून

‘राजकारण्यांकडून विविध पातळ्यांवर मनोरंजन होतच असते. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केली आहे. किरीट सोमय्यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडेच ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. पण आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे हास्यजत्रा म्हणून पाहिले जात नव्हते,’ असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

‘ईडीच्या नावाने धमक्या द्यायच्या व चिखलफेक करायची हेच त्यांचे काम. सार्वजनीक जीवनात वावरणाऱ्या लोकांनी टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावे लागते. सामनातील अग्रलेखावर चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली व एक खरमरीत पत्र सामनास पाठवले. त्यात भूमिका कमी व जळफळाटच जास्त. त्या पत्रात चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी अपमानकारक, अब्रुनुकसानी करणारी विधाने करुनही ते प्रसिद्ध करण्याचे मोठेपण सामनाने दाखवले. पण लिहताना, बोलताना भान सुटले की स्वतःच्याच धोतरात पाय कसे अडकून पडतात ते या पत्रावरुन दिसते,’ अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे.

वाचाः मुंबईत हत्याराचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी परिचयातील!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.