Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आता मी त्यांनाही सांगतो, अहो घाबरू नका! पळू नको!; नरेंद्र मोदींनी राहुल, सोनिया गांधींची उडवली खिल्ली

12

वर्धमान/कृष्णनगर: ‘देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला सार्वत्रिक निवडणुकीत अर्धशतकचा टप्पा ओलांडण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आत्तापर्यंतच्या सर्वाधिक कमी जागा मिळतील,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. केरळमधील वायनाडमध्ये पराभवाच्या भीतीने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.

वर्धमान-दुर्गापूर आणि कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील रॅलींना संबोधित करताना मोदी बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास अनुसूचित जाती, दलित आणि ओबीसींचे आरक्षण काढून घेईल आणि ते त्यांच्या ‘जिहादी व्होट बँके’ला देईल.
भाषण सुरू असताना चिठ्ठी आली; अजित पवार म्हणाले, …आणि ठोकाठोकी करण्याचा कार्यक्रम यांनी घेतलाय

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या (सप) उमेदवाराने ‘व्होट जिहाद’ टीकेचे समर्थन केल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधी ‘इंडिया’ आणि काँग्रेसवर टीका केली. राहुल गांधींचे नाव न घेता ते म्हणाले की, वायनाडमध्ये ‘युवराज’ हरणार आहेत आणि पराभवाच्या भीतीने मतदान संपताच ते तिसऱ्या जागेचा शोध सुरू करतील, हे आपण आधीच सांगितले होते.
Baramati Lok Sabha: सहनशीलतेचा अंत पाहू नका, पुन्हा बोलला तर…; सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना इशारा

‘पूर्वीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसच्या जागा कमी होणार आहेत. हे लोक निवडणुका जिंकण्यासाठी लढत नसून, केवळ देशाचे विभाजन करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानाचा वापर करत आहेत, हे आता देशालाही कळू लागले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा आत्तापर्यंतच्या सर्वात कमी असतील. काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी पक्ष यावेळी अर्धशतकांचा टप्पा पार करू शकणार नाही. त्यांना ५० जागा मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागणार आहे,’ असेही मोदी म्हणाले.

राहुल, सोनिया गांधींची उडवली खिल्ली

‘आता दुसऱ्या जागेवरही त्यांचे सर्व अनुयायी म्हणत होते, की ते अमेठीला येतील. पण ते (राहुल) अमेठीला इतके घाबरले आहेत, की ते तिथून पळून गेले आणि आता रायबरेलीचा मार्ग शोधत आहे. हे लोक देशभरात फिरून सर्वांना सांगतात की घाबरू नका! आता मी त्यांनाही सांगतो, अहो घाबरू नका! पळू नको!,’ अशी खिल्लीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडवली. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही पंतप्रधानांनी लक्ष्य केले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यंदा निवडणूक लढवण्याची हिंमत करणार नसल्याचे आपण तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्या घाबरून पळून जातील. त्या राजस्थानला पळून गेल्या आणि राज्यसभेत दाखल झाल्या, असेही मोदी म्हणाले.

‘मैदानातून पळून जाणारा नेता नको’

रोहतक : ‘भारताला ५६ इंचाची छाती असलेल्या नेत्याची गरज आहे, युद्धातून पळून जाणाऱ्या नेत्याची नाही,’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अमेठी सोडून रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. येथे जाहीर सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी ही टीका केली.

‘रायबरेलीतून उतरवण्याचा प्रयत्नही फसणार’हुक्केरी (कर्नाटक) : ‘काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीतून पळून गेल्यानंतर उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तिथे त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडून मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागेल. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राहुल गांधींना ‘लाँच’ करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले असून, हा एकविसावा प्रयत्न आहे,’ अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली. बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.