Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रायफल, पिस्तुल, महागड्या कार्स आणि कोट्यवधींचं कर्ज; किती आहे ब्रिजभूषण सिंह यांचा लेक करण भूषणची संपत्ती
करण भूषण सिंग यांच्यावर २२ कोटी ६६ लाख रुपयांचे बँकेचं कर्ज आहे, तर त्यांची पत्नी नेहा सिंग यांच्यावर २७ लाख ४६ हजार रुपयांचे कर्ज आहे.
कैसरगंजमधील भाजपचे उमेदवार करण भूषण शरण सिंह यांना महागड्या कार्स आणि शस्त्रास्त्रांची आवड आहे. त्यांच्या नावावर ६ वाहनं, ३ शस्त्रे आणि २२ एकर जमीन आहे. त्यांच्याकडे तीन शस्त्रे असून त्यात ३२ बोअरची ७ लाख रुपयांची पिस्तूल, १३ लाख रुपये किमतीच्या २ बंदुका आणि ७ लाख रुपये किमतीची १ रायफल आहे. करण भूषण सिंहच्या नावावर ५ लाख रुपये किमतीचे एक हैबा, ४ लाख रुपये किमतीची एक जेसीबी आणि २५ लाख रुपये किमतीच्या ३ जेसीबी आहेत.
करण भूषण सिंग यांच्याकडे ५० ग्रॅम सोनं आहे. याची किंमत ३३५००० रुपये आहे, तर त्यांची पत्नी नेहा यांच्याकडे २०० ग्रॅम सोने असून त्याची किंमत १३४०००० रुपये आहे.
करण भूषण शरण सिंह हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा सर्वात लहान मुलगा आहे आणि सध्या ते उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. करण सिंह यांनी परदेशात शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून बिजनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. ते डबल ट्रॅप नेमबाजीतही राष्ट्रीय खेळाडू आहेत.
भाजपने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचं तिकीट रद्द करून त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आपल्या मुलाला तिकीट मिळाल्यावर ब्रिजभूषण शरण यांनी पक्षाचे आभार मानत, संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असल्याचं म्हटलं होतं. कैसरगंज जागेवर २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे कैसरगंज मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. यावेळी ते या जागेवरून निवडणूक लढवत नसले तरी ते आपल्या मुलाचा प्रचार करणार आहेत.