Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मायक्रोसॉफ्टच्या इशाऱ्याने अँड्रॉइड युजर्सचे वाढले टेन्शन; हॅकर्स करू शकतात ‘डर्टी स्ट्रीम’ ॲटॅक

13

काही लोकप्रिय अँड्रॉईड ॲप्समध्ये त्रुटी आढळल्या आहेत.ॲप्समधील या त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर सहज एंटर करू शकतात. या टीमने युजर्सना सावध राहण्यासाठी सांगितलेल्या ॲप्समध्ये ‘Xiaomi चे फाइल मॅनेजर’ आणि ‘WPS ऑफिस’ या यांचा समावेश आहे.

‘डर्टी स्ट्रीम’ ॲटॅक

स्मार्टफोन युजर्ससाठी पुन्हा एकदा मोठा धोका निर्माण झाला आहे. मायक्रोसॉफ्टने जगभरातील अँड्रॉइड युजर्ससाठी एक मोठा इशारा दिला आहे. मायक्रोसॉफ्टच्या थ्रेट इंटेलिजन्स टीमला लोकप्रिय अँड्रॉइड ॲप्समध्ये बग सापडले आहेत. ॲप्समधील या त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर सहज प्रवेश करू शकतात. सुरक्षा पथकाने याला ‘डर्टी स्ट्रीम’ हल्ला म्हटले आहे. या हल्ल्यामुळे हॅकरला सेटिंग्जमध्ये छेडछाड करून युजर्सच्या अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळतो. याच्या मदतीने हॅकर्स यूजर्सच्या फोनमधील सर्व डेटा सहज पाहू शकतात.

ॲप्स युजर्सनी त्वरित करावे अपडेट

मायक्रोसॉफ्टने ज्या ॲप्सना धोकादायक म्हटले आहे.त्यातील एक म्हणजे Xiaomi चे फाईल मॅनेजर जे 1 बिलियन पेक्षा जास्त म्हणजेच 100 कोटी वेळा डाउनलोड झाले आहे. त्याच वेळी, WPS ऑफिस 500 दशलक्ष (50 कोटी) वेळा डाउनलोड केले गेले आहे. ही दिलासादायक बाब आहे की, ॲप्समधील ही मोठी त्रुटी आता दूर करण्यात आली असून मायक्रोसॉफ्टने या ॲप्सच्या युजर्सना त्वरित अपडेट करण्यास सांगितले आहे.

अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सने घ्या ही काळजी

अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून स्वत:ला हॅकर्सपासून सुरक्षित ठेवू शकतात. ॲप्स अपडेट ठेवणे यापैकी प्रथम येते.
वेळोवेळी Google Play Store वर जाणे आणि तुमच्या फोनमधील ॲप्स अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. ॲप्समध्ये कोणतीही समस्या उद्भवल्यास, डेव्हलपर सुरक्षा पॅच रोल आउट करतात, जे अपडेट करून तुम्ही सुरक्षित राहू शकता.

केवळ विश्वसनीय सोर्सेसकडून ॲप्स डाउनलोड करा

नेहमी केवळ विश्वसनीय स्त्रोतांकडून ॲप्स डाउनलोड करा. याशिवाय ॲप्सना परवानग्या देताना लक्षात ठेवा की, त्या ॲपद्वारे मागितलेल्या परमिशनची खरंच गरज आहे का? बऱ्याच वेळा आपण नकळत ॲप्सना चुकीच्या परमिशन देतो आणि यामुळे हॅकर्सना डिव्हाइसमध्ये एंट्री मिळते. मायक्रोसॉफ्टने Google सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे ॲप डेव्हलपर्सना अशा धोक्यांची माहिती दिली जाऊ शकते आणि युजर्सची सुरक्षा सुधारली जाऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.