Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कोरोना लसीच्या नावावर तुमचे बँक अकाऊंट होऊ शकते रिकामे; स्कॅमर्सनं आणला नवीन व्हॅक्सीन स्कॅम, चेक करा
सायबर फसवणूक अनेक प्रकारे होत असते. काही फसवणूक करणारे एसएमएस-मेसेजची मदत घेतात, तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करतात. मेसेजमध्ये तुम्हाला एक धोकादायक लिंक पाठवली जाते, त्यावर क्लिक केल्यावर तुमची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. त्याच वेळी, फसवणूक करणारे सोशल मीडियावर बनावट पोस्ट आणि जाहिराती तयार करून लोकांची दिशाभूल करतात.
कोरोना लसीच्या नावाखाली अशी होते फसवणूक
यावेळी सर्वात मोठा धोका म्हणजे कॉलद्वारे होणारी फसवणूक. सायबर गुन्हेगारांसाठी, ‘फोन कॉल’ हा फसवणूक करण्याचा एक भन्नाट मार्ग आहे, ज्यामुळे काही मिनिटांत फसवणूक केली जावू शकते. कोरोना लसीच्या नावाखाली फसवणूक करणारे निष्पाप लोकांना कसे अडकवतात ते जाणून घेऊया
- आरोग्य विभाग किंवा लस केंद्राचे सरकारी अधिकारी असल्याचे सांगून करणारे कॉल करतात. ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला कोरोनाची लस मिळाली आहे की नाही.
- बऱ्याच प्रकरणांमध्ये, त्यांच्याकडे आधीच तुमची माहिती असते, जी ते कॉलवर व्हेरीफाय केली जाते.
- तुम्हाला खात्री पटवून देण्यासाठी, स्कॅमर्स तुमच्या फोन नंबरवर OTP पाठवतात.
- तुम्ही OTP एंटर केल्यानंतर स्कॅमर्सचा खेळ सुरु होतो.
- जे लोक स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकून OTP सांगतात, त्यांचे बँक खाते OTP द्वारे हॅक केले जाते.
- यानंतर बँक खाते रिकामे होते.
- अशाप्रकारे कोरोना लसीच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांना आपला शिकार बनवतात.
स्कॅमपासून असा करावा स्वतःचा बचाव
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोन कॉल किंवा SMSला प्रतिसाद देऊ नका: जर कोणी तुम्हाला कोरोना लसीसंदर्भात कॉल किंवा मेसेज करत असेल आणि तो सरकारी कर्मचारी असल्याचा दावा करत असेल तर सावध राहा. कोणतीही माहिती देण्यापूर्वी त्याची ओळख आणि सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
- फक्त सरकारी वेबसाइट आणि अधिकृत स्त्रोतांकडून माहिती मिळवा: लसीशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, फक्त सरकारी वेबसाइट आणि अधिकृत स्त्रोत वापरा.
- तुमचे कुटुंब आणि मित्रांना जागरूक करा: तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना या फसवणुकीबद्दल सांगा जेणेकरून ते देखील सावध राहतील.
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुम्ही कोरोना लस घोटाळ्याचे बळी असाल तर आधी पोलिसांना कळवा. तसेच तुमच्या बँकेला याबाबत कळवा आणि बँकेला कार्ड आणि खाते ब्लॉक करण्यास सांगा.
सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी https://cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट द्या आणि ऑनलाइन तक्रार दाखल करा. कोरोना लस, प्रमाणपत्र इत्यादींसंबंधी माहितीसाठी, Cowin पोर्टल (https://www.cowin.gov.in) वापरा.