Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतीय बॉक्स ऑफिसवर निराशा, अमेरिकेत मात्र हाऊसफुल्ल शो, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमाची कमाई किती?

8

मुंबई: ‘गीतरामायणा’ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. भारतीय बॉक्स ऑफिसवर सिनेमाला फार यश मिळालं नसलं तरी परदेशात मात्र हा सिनेमा हाऊसफुल्ल होताना दिसतोय.
श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. समीक्षकांनीही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ला आपली पसंती दर्शवली. पण घरच्या बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात सिनेमाला फार यश आलं नाहीये. असं असताना परदेशात मात्र या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेत या चित्रपटाचे १०० शोज ‘हाऊसफुल’च्या दिशेनं वाटचाल करत आहेत तर चित्रपटाला अनेकांनी ५ स्टार्स दिले आहेत. इतकंच नाही तर हा चित्रपट आता दुबई, लंडन आणि जर्मनीमध्येही प्रदर्शित होणार आहे.
डॉक्टर आहे साई पल्लवी, सातवीत प्रेम पत्रामुळे खाल्लेला मार, वाचा अभिनेत्रीबद्दल अनोखे किस्से

याबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ” परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही शोज हाऊसफुल्ल झाले होते. महाराष्ट्रात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असतानाच परदेशातील प्रेक्षक सिनेमावर जास्त प्रेम या चित्रपटावर करत आहेत, हे खरंच भारावणारे आहे. बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की, त्यांची ख्याती जगभरात आहे. आजही त्यांची गाणी अजरामर आहेत. तरुणाईही त्यांची गाणी तितक्याच आत्मीयतेनं ऐकते. चित्रपटाबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्याच कलाकारांचं कौतुक होत आहे. एका टीमला यापेक्षा जास्त काय हवे. मी सगळ्याच प्रेक्षकांचा मनापासून आभारी आहे.”
हा राजकीय हेतू आहे का? जीवनसाथी निवडताना तुम्ही दुसऱ्या भाषेचा… चित्रा वाघ यांचा रेणुका शहाणे यांना टोला

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कमाई किती?
कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमानं सात -आठ दिवसांत दीड ते दोन कोटींचा गल्ला जमावला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.