Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशी कधी? या दिवशी भगवान विष्णुला कसे कराल प्रसन्न? शुभ मुहूर्त, तिथी जाणून घ्या
Mohini Ekadashi Tithi 2024 :
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात एकदाशी तिथी साजरी केली जाते. महिन्याच्या प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी येते. एकादशी ही तिथी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी उपवासही केला जातो.
एकादशीचा उपवास करणे म्हणजे मन आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे. अशातच वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यंदा ही एकादशी १९ मे रोजी असणार आहे.
धार्मिक मान्येतनुसार ही एकादशी अधिक खास मानली गेली आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. जाणून घेऊया मोहिनी एकादशीचा शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजा पद्धत
वैशाख मासातील शुक्ल पक्षातील १९ मे ला मोहिनी एकादशी असणार आहे. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद मिळावा यासाठी उपवास केला जातो. असे म्हटले जाते की, या दिवशी उपवास व मनोभावे पूजा केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. जाणून घेऊया मोहिनी एकादशीचे महत्त्व
1. मोहिनी एकादशी तिथी
हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशीची तिथी १८ मे २०२४ ला सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी सुरु होईल तर १९ मे २०२४ ला दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी संपेल. उदयन तिथीनुसार या एकादशीचे व्रत १९ मे ला केला जाईल.
2. मोहिनी एकादशीचे महत्त्व
विष्णु पुराण आणि पद्य पुराण यामध्ये मोहिनी एकादशीचे व्रत आणि त्याचे महत्त्व काय याबद्दल सांगितले आहे. मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तसेच मोक्ष प्राप्ती देखील सहज होते असे म्हटले आहे. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता. त्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते.
3. पौराणिक कथा
धार्मिक कथेनुसार असे म्हटले गेले आहे की, समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे भांडे बाहेर पडले तेव्हा अमृत वाटण्यावरुन देव आणि दानव यांच्या वाद झाला. देवतांच्या विनंतीनुसार भगवान विष्णुंनी राक्षसांचा पराभव करण्यासाठी मोहिनीचे रुप धारण केले.
या वेळी भगवान विष्णुने अप्सरेचे रुप धारण करुन कपटपणाने राक्षसांचा पराभव करण्यात देवांना मदत केली. त्यांनी आपल्या रुपाने राक्षसांना संमोहित केले आणि देवांना सर्व अमृत प्यायला लावून अमर राहाण्याचे वरदान दिले. या एकादशीचे महत्त्व खुद्द भगवान श्रीकृष्णानेच युधिष्ठिरांना सांगितले होते, असे म्हटले जाते. या एकादशीचे व्रत केल्यास अनेक यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते.