Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
टिपस्टर इवान ब्लासनं X वर 3 पोस्टच्या माध्यमातून Samsung Galaxy M35 च्या डिजाइन आणि कलर ऑप्शनचा खुलासा किया, ज्यात स्मार्टफोन ग्रे, लाइट ब्लू आणि डार्क ब्लू कलर ऑप्शनमध्ये दिसला आहे. या पोस्टमधून स्मार्टफोनच्या डिस्प्ले, रियर पॅनल आणि बटनसह सर्व अँगलचा खुलासा झाला आहे.
Samsung Galaxy M35 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो जो वरच्या बाजूला डावीकडे एका कोपऱ्यात एलईडी फ्लॅशसह दिसत आहे, ही प्लास्टिक बॅक वाटत आहे. तसेच Galaxy M35 मध्ये एक होल पंच सेल्फी कॅमेरा कटआउट दाखवण्यात आला आहे. लीक झालेल्या फोटोनुसार, स्मार्टफोनच्या चारही कॉर्नरवर जाड बेजेल्स आहेत.
दरम्यान आगामी Samsung Galaxy M35 च्या लीक झालेल्या फोटोवरून समजलं आहे की हा कंपनीच्या Galaxy A35 फोनशी खूप मिळत-जुळत असेल, जो मार्चमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. या फोनच्या आत उजवीकडे वॉल्यूम आणि पावर बटन देण्यात आला आहे. तर डावीकडे वरच्या बाजूला सिम ट्रेची लोकेशन आहे.
Samsung नं आतापर्यंत Galaxy M35 च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला नाही, टिपस्टरनुसार स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी असू शकते. जी Samsung Galaxy A35 पेक्षा चांगली आहे, ज्यात 5,000mAh ची बॅटरी आहे. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टमधून समजलं आहे की आगामी एम-सीरीज स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM सह Exynos 1380 प्रोसेसर असेल.