Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारताच्या निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात चुरशीची लढत; या उमेदवाराचा फक्त एका मताने विजय झाला होता

9

नवी दिल्ली: देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. अनेक उमेदवार आणि देशातील मोठे राजकीय नेते विक्रमी मतांनी विजयी होण्याचा दावा प्रचार सभेतून करत आहेत. जसा एखाद्या उमेदवाराचा विक्रमी मतांनी विजय होतो तसाच अतिशय कमी मतांनी पराभव देखील होतो. देशाच्या राजकीय इतिहासात असे दोन प्रसंग घडले आहेत ज्यात विजयाचे अंतर फक्त एका मताचे होते.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीत नाही तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दोन वेळा फक्त एका मताने आमदारकीची लॉटरी लागली आहे. २००४च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनता दल (धर्मनिरपेक्ष) मधील ए.आर.कृष्णमूर्ती यांचा काँग्रेसच्या आर ध्रुवनारायण यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव केला होता. ही घटना संथेमरहल्ली विधानसभा मतदारसंघात घडली. कृष्णमूर्ती यांना ४०,७५१ मते मिळाली, तर ध्रुवनारायण यांनी केवळ ४०,७५२ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

अशीच दुसरी घटना २००८ मध्ये राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत घडली होती. हे नाथद्वारा विधानसभा मतदारसंघात घडले, जिथे काँग्रेसचे सीपी जोशी आणि भाजपचे कल्याण सिंह चौहान एकमेकांच्या विरोधात होते. निकाल जाहीर झाल्यानंतर चौहान यांना ६२,२१६ मते मिळाली, तर जोशी यांना ६२,२१५ मतांवर समाधान मानावे लागले.

यामुळे जोशींना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते आणि मुख्यमंत्रिपदासाठी ते आघाडीचे उमेदवारही होते. आपल्या पक्षाला यशापर्यंत नेऊनही त्यांनी स्वतःची जागा एका मताने गमावली.
Monsoon Update: आनंदाची बातमी, मान्सून अंदमानमध्ये पोहोचला, महाराष्ट्रात कधी दाखल होणार? जाणून घ्या तारीख

चौहान यांच्या पत्नीने दोन मतदान केंद्रांवर मतदान केल्याचा आरोप जोशी यांनी केल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. राजस्थान उच्च न्यायालयाने जोशी यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, शेवटी सर्वोच्च न्यायालयात त्यांचा पराभव झाला.

२०१३मध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालात असे म्हटले होते की, सीपी जोशी यांची आई, बहीण आणि ड्रायव्हर मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करू शकले नाहीत. विशेष म्हणजे, कर्नाटकमध्ये कृष्णमूर्ती यांच्या ड्रायव्हरला मतदान करण्याची इच्छा होती, परंतु कृष्णमूर्तींनी मतदानाच्या दिवशी त्यांना त्यांच्या कर्तव्यातून ब्रेक न दिल्यामुळे ते करू शकले नाहीत.

2018 मध्ये झालेल्या मिझोरम विधानसभा निवडणुकीत असेच एक उदाहरण समोर आले. तुईवॉल विधानसभा मतदारसंघातून मिझोराम नॅशनल फ्रंट (MNF) चे लालछंदमा राल्टे हे विद्यमान काँग्रेस आमदार आरएल पिनमाविया यांच्या विरोधात केवळ तीन मतांच्या फरकाने विजयी झाले. राल्टे यांना ५,२०७ मते मिळाली, तर पियानमाविया यांना ५,२०४ मते मिळाली. पियानमाविया निकालावर खूश नव्हते, म्हणून त्यांनी मत फेरमोजणीची विनंती केली. निवडणूक आयोगाने फेरमतमोजणीला सहमती दर्शवली, मात्र फेरमतमोजणीनंतरही मतांचा फरक तसाच राहिला.

लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास निवडणूक आयोगाच्या डेटावरून असे लक्षात येते की, १९६२ ते २०१४ दरम्यान किमान दोन निवडणुका झाल्या ज्यात एक अंकी मतांच्या फरकाने निकाल लागला. १९८९ मध्ये आंध्र प्रदेशातील अनकापल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे कोनाथला रामकृष्ण यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.पराभव उमेदवारापेक्षा रामकृष्ण यांना केवळ नऊ अधिक मते मिळाली होती. १९९८ मध्ये बिहारमधील राजमहल लोकसभा मतदारसंघात भाजपचे सोम मरांडी देखील नऊ मतांनी विजयी झाले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत थुपस्तान चेवांग यांनी लडाख मतदारसंघातून केवळ ३६ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. १९६२ पासून एकूण आठ असे खासदार आहेत ज्यांचा विजय एकेरी किंवा दुहेरी मतांच्या फरकाने झाला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.