Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- विरोधी पक्षनेत्यांचे पूरग्रस्त भागांत दौरे
- ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेची खोचक टिप्पणी
- फडणवीसांनी दिल्लीत वजन वापरावे – शिवसेना
विदार्भ मराठवाड्यात अलीकडंच झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. ‘आम्हाला आता केवळ तुमच्याकडूनच अपेक्षा आहे’ असं काही शेतकऱ्यांनी फडणवीस व दरेकर यांना सांगितल्याचं प्रसिद्ध झालं आहे. त्याचाच संदर्भ देत शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर तोफ डागली आहे.
वाचा: LIVE आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता
‘फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळं राज्याचे शेतीविषयक प्रश्न व आर्थिक घडी याविषयी त्यांना चांगलीच माहिती आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची त्यांची मागणी योग्यच आहे. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात आलेल्या पुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, पण केंद्रीय पाहणी पथकं वेळेवर आली नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळू शकलेली नाही. पुराच्या विळख्यात सापडलेला शेतकरी हा राजकारणाचा विषय नाही. केंद्रातल्या मोदी सरकारनं शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकारला सढळ हस्ते मदत करावी, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी व राज्याचे रखडलेले पैसे आपले वजन वापरून घेऊन यावेत,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा: आर्यनच्या अटकेनंतर सलमान मन्नतवर; शाहरुखशी नेमकी कोणती चर्चा झाली?
‘आमचा दौरा केवळ प्रशासनाला जागं करणं व शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून प्रशासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. या त्यांच्या विधायक भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पंतप्रधान मोदी हे विरोधकांकडून नेहमीच विधायक भूमिकेची अपेक्षा करतात. विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचं ज्वलंत मत मोदी यांनी नुकतंच मांडलं. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्याबरहुकूम राज्यातल्या विरोधी पक्षानं वागायचं ठरवलं असेल तर त्यात त्यांचं व राज्याचंही हित आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे. कारण मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीसांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पक्षीय राजकारण साधलंच. म्हणजे पूरग्रस्तांचं सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.