Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोवॅक्सिन लस घेतलेल्यांची चिंता वाढली होती, ICMR म्हणाले, ‘तो’ लेख चुकीचा आणि दिशाभूल करणारा!

7

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात कोट्यवधी नागरिकांना लसीकरण करण्यात आलेल्या कोवॅक्सिनच्या दुष्परिणामांवर बनारस हिंदू विद्यापीठाने (बीएचयू) प्रसिद्ध केलेला कथित संशोधनपर लेख दिशाभूल करणारा आहे आणि यात आमच्या संस्थेचा चुकीचा उल्लेखही केला गेला आहे. या संशोधनात ज्या काही घटना (केस स्टडीज) नोंदवल्या गेल्या आहेत त्यांचा कोविड-१९ लसीकरणाशी संबंध जोडता येणार नाही अशा शब्दांत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सोमवारी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.या संशोधनासाठी आम्ही कोणतेही आर्थिक किंवा तांत्रिक सहाय्य दिलेले नाही असे सांगून आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी संबंधित नियतकालिकाच्या लेखकांना आणि संपादकांना पत्र लिहून आयसीएमआरचा उल्लेख तात्काळ काढून टाकण्यास सांगितले आहे. कोवॅक्सिनच्या दुष्परिणामांविषयी अलीकडे बीएचयू मध्ये हे संशोधन करण्यात आले होते. यावरील लेख एका विदेशी वैद्यक नियतकालिकात प्रकाशित झाले होते. भारत व्हायोटेकने विकसित केलेल्या कोवॅक्सिन लसीचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत असे वृत्त यानंतर प्रसिध्द झाले. या नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की ज्या लोकांना कोवॅक्सिन लस दिली गेली, त्यापैकी 30 टक्के लोकांना काही प्रकारचे दुष्परिणाम दिसले. त्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित मोठ्या समस्याही दिसून येत आहेत.
कोविशिल्ड’ पाठोपाठ ‘कोवॅक्सिन’ लसीने वाढवली चिंता; बनारस हिंदू विद्यापीठाचा अहवाल आला समोर…

आयसीएमआरने याबाबत न्यूझीलंडमधील ड्रग सेफ्टी जर्नल आणि बीएचयू मासिकाच्या संपादकांना जी लेखी नोटीस पाठवली त्यात म्हटले आहे की एका वर्षाच्या अभ्यासात लस घेत असलेल्या लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम आढळून आलेले कथित संशोधनातील निष्कर्ष पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि खोटे आहे आयसीएमआरशी याचा काहीही संबंध नाही. या संशोधनासाठी आम्ही कोणतीही तांत्रिक मदत किंवा कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. या अभ्यासात कोवॅक्सिनचा उल्लेख करून म्हटले आहे की या लसीच्या प्रभावाचा एक वर्ष अभ्यास करण्यात आला. परंतु ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्याशी तुलना केलेली नाही. मग हे दुष्परिणाम लस घेतलेल्यांनाच झाले हे कसे समजायचे. ज्या दुष्परिणामांचा उल्लेख केला जात आहे तेदेखील सामान्य दुष्परिणाम आहेत आणि कोणतेही इंजेक्शन घेतलेल्या कोणालाही ते होऊ शकतात.
Corona Virus : कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली; महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचे ९१ रुग्ण आले आढळून

आयसीएमआरने म्हटले आहे की या अभ्यास संशोधनात सहभागी असलेल्या लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांना आधीच कोणत्या प्रकारच्या समस्या होत्या याबद्दल कोणताही उल्लेख केला गेला नाही. यावरून लस घेतल्यानंतरच व्यक्तीला दुष्परिणाम जाणवले आहेत हे कसे तपासता येईल? अशा परिस्थितीत कोविड-१९ लसीशी त्याचा संबंध जोडणे अयोग्य आहे. या अभ्यासात एक हजाराहून कमी व्यक्तींचा डेटा ज्या पद्धतीने घेण्यात आला तोही पूर्णपणे एकतर्फी आहे. विशेष म्हणजे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांकडून फोनवरून माहिती घेण्यात आली. त्यांना लस घेतल्यावर कोणती समस्या येत आहे हे विचारण्यात आले. ही वस्तुस्थिती स्वतःच दिशाभूल करणारी आहे कारण या प्रकरणात कोणतीही शारीरिक तपासणी किंवा रक्त चाचणी केली गेली नाही. या सर्व चुकीच्या माहितीच्या आधारे केलेल्या या संशोधनात आमचा संदर्भ त्वरित काढून टाका, असेही आयसीएमआर ने सांगितले आहे.

बीएचयूने केलेल्या अभ्यासानुसार, कोवॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये ह्रदयविकाराचा झटका आणि गुइलेन बॅरे सिंड्रोम यासारखे विकारदेखील एक टक्के लोकांमध्ये दिसून आले. याशिवाय किशोरवयीन मुलांमध्ये त्वचेशी संबंधित आजार, मज्जातंतूचे प्रश्न यांसारख्या समस्याही दिसून आल्या. ५. ८ टक्के लोकांमध्ये स्नायूंशी संबंधित समस्याही दिसून आल्या. अभ्यासात असे आढळून आले की कोवॅक्सिनचे डोस घेतलेल्या ४.६ टक्के महिलांना मासिक पाळी संबंधित गंभीर समस्या आणि डोळ्यांच्या समस्या देखील आढळले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.