Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Samsungचा धमाकेदार प्लॅन! फुटलेली स्क्रीन असो किंवा सॉफ्टवेअरची समस्या वर्षातून दोनवेळा फोन रिपेयर करा मोफत

9

Samsung कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये भारतात स्मार्टफोन आणि टॅब्लेटसह अनेक डिवाइसेस आहेत. हे सर्व डिवाइस वेगवेगळी किंमत आणि फिचर्ससह येतात. त्यांच्या प्रोटेक्शनसाठी, कंपनीकडे आधीपासूनच Samsung Care+ प्रोग्राम आहे, कंपनीने हा प्रोग्राम आता फ्री अपग्रेड केला आहे. या अपग्रेडमध्ये, युजर्स त्यांचे डिव्हाइस वर्षातून दोनदा मोफत रिपेयर करू शकतील.

कंपनीच्या या सर्विसमध्ये युजर्स

वापरकर्ते स्क्रीन प्रोटेक्शन आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शनचा लाभ वर्षातून दोनदा घेऊ शकतात. Samsung Care+ हा Galaxy डिवाइसेससाठी लाँच करण्यात आलेला एक विशेष प्रोग्राम आहे. यामध्ये युजर्सना कोणत्याही डेप्रिसिएशन 100% सिक्युरिटी मिळते.

घरूनही डिवाइस होईल पिकअप

Samsung Care+ अंतर्गत, युजर्सना वॉक-इन आणि पिक-अपची सुविधा मिळते. येथे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कोणताही एक ऑप्शन निवडू शकतात आणि त्यांच्या डिव्हाइसची रिपेयरिंग करू शकतात. यावेळी तुम्ही टाईम टेबल देखील तयार करू शकता.

Samsung Care+मध्ये मिळतील जेन्युअन पार्ट्स

सॅमसंग केअर+ बाबत, कंपनीचा दावा आहे की सॅमसंग उत्पादनांच्या दुरुस्तीसाठी अस्सल भाग वापरण्यात आले आहेत. तसेच, डिव्हाइसच्या कार्यक्षमतेसह कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. याच्या मदतीने तुमचे उपकरण अगदी नवीन उपकरणाप्रमाणे काम करेल.

Samsung Care + प्लॅनची किंमत

Samsung Care+ प्लॅन 399 रुपयांपासून सुरू होतो, संपूर्ण Galaxy सिरीज या प्लॅनमध्ये कव्हर होते. यामध्ये Galaxy Smartphone, Galaxy Tablet, Galaxy Watch, Galaxy Book यांचा देखील समावेश आहे. तसेच, Samsung Care+ मध्ये कोणत्याही अटींशिवाय या प्लॅनचा लाभ घेता येतो, यासाठी कोणतीही कागदपत्रे सबमिट करावी लागत नाही.

कंपनीने सांगितले की, सर्विस टाईममध्ये युजर्सचा डेटा प्रायव्हसी यांचे पूर्णपणे प्रोटेक्शन केले जाते. यासह, ग्राहकाला हवे असल्यास, रिपेयरिंग प्रोसेसला ट्रॅक करू शकतो, यासाठी एक सिंपल प्रोसेस फॉलो करावी लागेल. डिवाइस खरेदी करताना Samsung Care+ हा प्लॅन देखील सोबत खरेदी करावा लागेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.