Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोणत्याही लिंकवर क्लिक करणे पडू शकते महाग; मागे सोडू नका Digital footprint

10

इंटरनेटवर कोणत्याही लिंकवर क्लिक करणे तुम्हाला महागात पडू शकते. अशा प्रकारे तुमचे छोटे छोटे डिटेल्स स्कॅमरपर्यंत पोहोचतात. तथापि, हे आवश्यक नाही की या डिजिटल फुटप्रिंटला नेहमी आपणच जबाबदार असाल. अनेक वेबसाइट तुमच्या डिव्हाइसवर कुकीज इन्स्टॉल करून तुमच्या ॲक्टिव्हिटीज फॉलो करू शकतात.

डिजिटल फूटप्रिंट म्हणजे काय

आपण इंटरनेट वापरत असताना, आपण काही प्रकारची माहिती मागे सोडतो. मागे राहिलेल्या या माहितीला डिजिटल फूटप्रिंट म्हणतात.सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणे, वृत्तपत्रांची मेंबरशीप घेणे, ऑनलाइन रिव्ह्यू सोडणे, आणि ऑनलाइन खरेदी करणे यातून डिजिटल फूटप्रिंट वाढतात.काहीवेळा ॲप्स देखील युजर्सच्या नकळत त्याचा डेटा गोळा करत असतात. तुम्ही एखाद्या कंपनीला तुमच्या माहितीचा ॲक्सेस देताच, त्यांना तुमचा डेटा थर्ड पार्टीला विकण्याचा ॲक्सेसही मिळतो.

डिजिटल फूटप्रिंटचे दोन प्रकार आहेत – सक्रिय आणि निष्क्रिय.

सक्रिय डिजिटल फूटप्रिंट

सक्रिय डिजिटल फूटप्रिंट्स म्हणजे जेव्हा युजर स्वतःबद्दल माहिती शेअर करण्यासाठी इंटरनेट वापरतो. जसे,
सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करणे आणि ऑनलाइन फॉर्म भरणे इत्यादी. एखाद्या रजिस्टर्ड युजरने वेबसाइटवर लॉग इन केले आणि काहीतरी पोस्ट केले, तर ही पोस्ट स्वतः युजरची सक्रिय डिजिटल फूटप्रिंट बनते.

निष्क्रिय डिजिटल फूटप्रिंट

युजरचा वैयक्तिक डेटा त्याच्या नकळत वापरणे याला निष्क्रिय डिजिटल फूटप्रिंट म्हणतात.उदाहरणार्थ, वेबसाइट युजर एखाद्या साईटला किती वेळा भेट देतो, तो कुठून येतो आणि त्याचा IP पत्ता काय आहे याबद्दल डेटा गोळा केला जातो. ही एक हिडन प्रोसेस आहे, ज्याची युजरला माहिती नसते.

डिजिटल फूटप्रिंट धोकादायक का असू शकतात?

सायबर गुन्हेगार फिशिंगसाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या तुमच्या डेटाचा गैरवापर करू शकतात. तुम्ही ऑनलाइन पोस्ट करता ते शब्द आणि फोटोंचा गैरवापर होऊ शकतो.

डिजिटल फूटप्रिंटच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी

  1. तुमच्या डिजिटल फूटप्रिंटचे संरक्षण करण्यासाठी, तुम्ही असुरक्षित वेबसाइट्सकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचे आहे. नेहमी सुरक्षित वेबसाइटला भेट देण्याचा प्रयत्न करा. फक्त http:// वेबसाइट https:// URL ने बदला.
  2. डिजिटल फूटप्रिंट कमी करण्यासाठी, जुनी खाती हटवणे महत्वाचे आहे. जुने सोशल मीडिया प्रोफाइल किंवा न्युज पेपर मेंबरशीप काढून टाकणे महत्त्वाचे आहे.
  3. डिजिटल फूटप्रिंट संरक्षित करण्यासाठी तुम्ही व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क वापरू शकता. IP पत्ता VPN सह लपविला जाऊ शकतो. यामुळे तुमच्या ऑनलाइन क्रिया शोधता येत नाहीत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.