Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Arvind Kejariwal : मला तुरुंगात टाकलं, म्हणजे तुम्हाला वाटलं पक्ष फुटणार, पण मोदीजी घडलं ते उलटंच, केजरीवालांची खोचक टीका

10

नवी दिल्ली : ‘दिल्लीत निवडणूक प्रचारासाठी जिथेही गेलो तिथे एकच गोष्ट सगळीकडे निदर्शनास आली. ती म्हणजे मला खोट्या केस मध्ये अडकवून तुरुंगात टाकले, याचा लोकांमध्ये खूप रोष आहे. याचा भाजपाला नक्कीच मोठा फटका बसणार आहे.’ असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

निवडणूक काळातच अटक झाली आणि मग जामीनावर सुटल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. इतिहासात पहिल्यांदाच आप आणि काँग्रेस दिल्लीत आघाडीतून निवडणूक लढवत आहे. यातच लोकसभेत आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांच्यापुढे या निवडणुकीत कसे आव्हान आहे आणि ते त्याला कसे सामोरे जाणार, अशा विविध राजकीय विषयांवर केजरीवालांनी ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.
Lok Sabha Elections 2024: सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार रिंगणात
अरविंद केजरीवाल दिल्लीतील राजकीय परिस्थितीवर आपले मत मांडत म्हणाले की, ‘दिल्लीत निवडणूक प्रचारासाठी जिथेही गेलो तिथे एकच गोष्ट सगळीकडे दिसली. ती म्हणजे मला खोट्या केस मध्ये अडकवून तुरुंगात टाकले, याचा लोकांमध्ये खूप रोष आहे. याचा भाजपाला मोठा फटका बसणार आणि ते दिल्लीतील सातही सीटवर हरणार आहेत.’

‘लोकांच्या मुलभूत गरजांबद्दल पंतप्रधान बोलत नाहीत कारण त्यांच्याकडे यासंदर्भात काही धोरणच नाही. महत्वपूर्ण हे आहे की, यावेळी भाजपा आणि संघ एक टीमसारखं काम करत आहे. त्यांच्यामध्ये बरेचसे मतभेद आहेत. तर जमिनीवर संघाचे लोक प्रचार करताना दिसत नाहीत. नरेंद्र मोदींच्या नंतर अमित शाह यांच्या पंतप्रधानापदाच्या दाव्यावरुन भाजपा नेत्यांमध्ये दरी वाढत चालली आहे. आणि सर्वांचा अर्थातच इंडिया आघाडीलाच फायदा मिळणार आहे.’ अशी टिप्पणी देखील केजरीवालांनी यावेळी केली.

निवडणूकीतील विजयी जागांचा अंदाज मांडताना केजरीवाल म्हणाले, मला वाटतं की इंडिया आघाडी आपल्या ताकदीवर ३०० पेक्षा जास्त जागा मिळवणार. आणि आम्ही देशाला स्वच्छ आणि जनतेसाठी काम करणारी सरकार देण्यात नक्कीच सफल होऊ.
दिल्लीत केजरीवालांना अजिबात सहानुभूती नाही, सातही जागा आम्ही जिंकू : फडणवीस
‘इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा दावेदार कोण’ यावर केजरीवाल म्हणाले, ‘निवडणूक निकालानंतर ते स्पष्ट होईलच, हा काही गहन प्रश्न नाही आहे. आणि माझं म्हणत असाल तर मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाहीच आहे. माझा छोटा पक्ष आहे आणि आम्ही २२ जागा लढवत आहोत. आम्ही लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत. ही मोदी सरकार जर पुन्हा सत्तेत आली तर सर्व विरोधकांना तुरुंगात टाकेन. आणि ही निवडणूक आमच्यासाठी देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणारी निवडणूकच आहे.’

तर पंजाबमध्ये आपण इंडिया आघाडीसोबत का नाही आहात हा सवाल उपस्थित केल्यावर केजरीवाल प्रत्युत्तरात म्हणाले, ‘पंजाब मधील स्थिती वेगळी आहे. तिथे भाजपा आहेच नाही. म्हणून तिथे जे काही मतदान होईन इंडिया आघाडीसाठीच.’

‘एक नव्हे तर दोन कारणांमुळे भाजपाचे नुकसान होत आहे. पहिल्यांदा मला निवडणुकीच्या वेळी अटक करण्यात आली, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. त्यानंतर काही दिवसांनी मला सर्वोच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मिळाला. त्यामुळे भाजपाचे लोक अधिकच बिथरले आहेत. ते मला अटक करतील आणि मग आमचा पक्ष फोडतील आणि दिल्ली आणि पंजाबमधील आमची सरकारे पाडतील, असे त्यांना वाटले होते पण घडले ते उलटेच.’ अशी टीका करत केजरीवाल यांनी ‘आमचा एकही माणूस फूटला नाही. कठीणप्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन पक्ष सांभाळला. त्यामुळे आमचा पक्ष आता आणखी मजबूतीने लोकांसमोर आला आहे.’ असे दखील भाजपाच्या नेत्यांना सुनावले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.