Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कंपनी देत आहे झोपण्यासाठी पैसे; चांगली झोप घेतल्यावर मिळताय पैसे

8

कोणतीही कंपनी तुम्हाला झोपण्यासाठी पैसे देईल का? असे टोमणे तुम्ही ऐकले असतील, पण अशी ऑफर कधीच ऐकली नसेल. एक कंपनी आहे जी आपल्या कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी पैसे देत आहे. हूप हे फिटनेस ट्रॅकर्सच्या जगात खूप लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी ही कंपनी आपल्या हेल्थ ट्रॅकिंग बँडमुळे चर्चेत होती.अलीकडेच WHOOP चे सीईओ विल अहमद यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. एका प्रकाशनाला दिलेल्या मुलाखतीत विलने सांगितले की त्यांची कंपनी ‘अनलॉकिंग ह्युमन परफॉर्मन्स’ या उद्देशावर काम करत आहे.

कंपनीची सुरुवात 2012 मध्ये झाली

2021 मध्ये कंपनीने 200 दशलक्ष डॉलर निधी उभारला होता. ही कंपनी 2012 मध्ये सुरू झाली आणि 500 कर्मचारी कार्यरत आहेत. अहमद म्हणाले की, “आमचा विश्वास आहे की ऑफिसमध्ये एकत्र येऊन काम केल्याने काम नेहमीच चांगली प्रॉडक्टिव्हिटी देते. एकमेकांना भेटून लोक कसे सकारात्मक वातावरण निर्माण करतात हे आपण पाहिले आहे.” इतकंच नाही तर त्यांची कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना झोपण्यावर बोनस देते असंही त्यांनी सांगितलं. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हूप सारखे स्टार्टअप कर्मचाऱ्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. कंपनी तिच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत हूप बँड आणि मेम्बरशीप प्रोव्हाईड करते.

झोपण्यासाठी कंपनी देत आहे पैसे

यासह, कंपनी अतिरिक्त बँड देखील ऑफर करते, जे कर्मचारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना देऊ शकतात. त्यांनी सांगितले की, कंपनी दर महिन्याला कर्मचाऱ्यांना बोनसही देते. विल अहमद म्हणाले की ज्या कर्मचाऱ्याची झोपेची सरासरी कामगिरी ८५ टक्के किंवा त्याहून अधिक आहे त्यांना दर महिन्याला अतिरिक्त १०० डॉलर दिले जातात. याशिवाय हूप काही काळापासून AI चा विचार करत आहे. गेल्या वर्षी कंपनीने हूप कोच लाँच केले, जे वैयक्तिकृत फिटनेस कोच आहे. हे AI टूल कंपनीने OpenAI च्या सहकार्याने विकसित केले आहे. विल म्हणाले की त्याच्या टीममधील प्रत्येकाला मान्यताप्राप्त एआय टूल्स वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.