Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

WMOने मुंबईत टाकला छापा, अनऑथोराइज्ड मोबाइल नेटवर्क बूस्टर केले जप्त

9

वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन (WMO) आणि दूरसंचार ऑपरेटर्सनी मुंबईतील ग्रँट रोड परिसरात छापा टाकून बेकायदेशीर मोबाइल सिग्नल बूस्टर आणि अँटेना जप्त करुन कारवाई केली आहे. WMS (DoT) मधील इंजिनिअर पीडी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला आणि प्रॉक्टर रोड (पूर्व) येथील गोमटेश इलेक्ट्रॉनिक्समध्ये आठ अँटेना आणि पाच नेटवर्क बूस्टर जप्त करण्यात आले, अशी माहिती WMOने दिली आहे.

बेकायदेशीर डीवाइसेस करण्यात आले जप्त

महादेव फॉरेक्स, शशिकृपा बिल्डिंग, सिम्प्लेक्स बिल्डिंग, गुप्ता ट्रान्सपोर्ट, श्री ईश्वर सदन, क्रिसेंट बिल्डिंग आणि लुकास असगर मंझिल यासह विविध ठिकाणी बेकायदेशीर नेटवर्क बूस्टरचा छडा लावण्यात आला आहे. शिवाय, बेकायदेशीरपणे हे डीवाइसेस चालतांना आढळलेल्यांना WMO द्वारे घटनास्थळी नोटीस बजावण्यात आली आहे.

नेटवर्कच्या क्वालिटीवर थेट परिणाम

अशा डीवाइसेसमुळे मोबाईल नेटवर्कच्या क्वालिटीवर थेट निगेटिव परिणाम होतो अशी चिंता टेलिकॉम ऑपरेटर्सनी व्यक्त केली आहे. WMOने सांगितले की हे बेकायदेशीर बूस्टर नेटवर्कमध्ये व्यत्यय आणतात, ज्यामुळे कॉल ड्रॉप आणि कमी डेटा स्पीड यासारख्या समस्या निर्माण होऊ लागते. इंडियन टेलीग्राफ कायदा, 1885, आणि इंडियन वायरलेस टेलिग्राफी कायदा, 1943, यानुसार वाइडबँड सिग्नल बूस्टरचा वापर बेकायदेशीर मानला जातो, यापूर्वी देखील अशा प्रकारची कारवाई होऊन अनेकांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

मोबाइल सिग्नल बूस्टर वापरणे हे बेकायदेशीर वीज किंवा पाणी पुरवठा कनेक्शन असण्यासारखेच आहे,” WMOने सांगितले की. “टेलिकॉम ऑपरेटर चांगल्या यूजर एक्सपिरियन्स स्पेक्ट्रम मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, परंतु या बूस्टर्समुळे सर्विस क्वालिटीला मोठा फटका बसतो.” दूरसंचार विभागाने (DoT) या बेकायदेशीर डीवाइसेसची विक्री थांबवण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला अनेक सूचना दिल्या आहेत, असे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

सिग्नल बूस्टर वापल्यास होऊ शकते कायदेशीर कारवाई

टेलिकम्युनिकेशन ऍक्ट, 2023 अंतर्गत, रेडिओ उपकरणे अनधिकृतपणे ठेवल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास, पन्नास लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. यामध्ये अनधिकृत टेलिकम्युनिकेशन उपकरणे बाळगणे किंवा वापरणे, आयडेंटिफायरशी छेडछाड करणे आणि फसव्या मार्गाने आयडेंटिफायर मिळवणे यांचा समावेश आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.