Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मीडिया रिपोर्टनुसार, पोको एम प्लस 5जी BIS वर लिस्ट आहे. लिस्टिंग मधून समजलं आहे की फोनचं कोडनेम breeze आणि मॉडेल नंबर 24065PC95I आहे. याव्यतिरिक्त, फोन संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही. गेल्या काही दिवसांत आलेल्या रिपोर्ट्सनुसार, हा मोबाइल फोन Redmi Note 13R चा रीब्रँडेड व्हर्जन असेल, जो एप्रिलमध्ये ग्लोबली लाँच करण्यात आला होता.
संभाव्य फीचर्स
वरील माहिती खरी ठरल्यास स्मार्टफोन 6.79 इंचाच्या FHD+ LCD डिस्प्लेसह येईल. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात क्वॉलकॉमचा Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर मिळेल. तसेच, हँडसेटमध्ये 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 8MP चा कॅमेरा आहे. तसेच, हा मोबाइल फोन लेटेस्ट Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
किंमत
स्मार्टफोन ब्रँड पोकोनं अजूनतरी POCO M6 Plus 5G च्या लाँच किंवा किंमतीची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लीक्सनुसार, हा डिवाइस जूनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. याची किंमत 15 ते 20 हजार रुपयांदरम्यान असू शकते.
POCO F6 5G लाँच
पोकोनं गेल्या आठवड्यात POCO F6 5G मोबाइल फोन भारतात लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपयांपासून सुरु होते. याची विक्री आज म्हणजे 29 मे पासून सुरु झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन 2712×1220 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे.
यात Snapdragon 8s Gen3 मिळतो. तसेच, मोबाइलमध्ये 12GB RAM आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटो क्लिक करण्यासाठी पोको एफ 6 मध्ये 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील 5000mAh ची बॅटरी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.