Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Muslim Vote : यंदाच्या निवडणुकीत ‘मुस्लिम’ समाज कुणासोबत ? तर असा आहे मतदानाचा पॅटर्न

12

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले असून सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडणार आहे. तर ४ जून रोजी निकाल लागणार असून केंद्रात कुणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचेच लक्षं लागलेलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वात जास्त मुस्लिम आणि अल्पसंख्यांक या दोन शब्दांचा जास्त उल्लेख ऐकायला मिळाला. त्याची सुरवात झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ एप्रिलला राजस्थानमध्ये केलेल्या भाषणातून. मोदींनी त्या भाषणात अल्पसंख्याकांबाबत भाष्य केलं होतं. आणि याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. एकीकडे काँग्रेसने पंतप्रधानांवर त्यांच्या जाहीरनाम्याबाबत संभ्रम पसरवल्याचा आरोप केला. मात्र, नंतर पंतप्रधान म्हणाले की मी हिंदू-मुस्लिम राजकारण करत नाही. आणि याचे परिमाण देशभरात पाहायला मिळाले. त्यामुळे मुस्लिम समाजाने कुणाला कौल दिला आहे. हे ४ जुन रोजीच कळेल. लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ८६ जागांवर अल्पसंख्याकांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. आणि या जागा उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्यांमध्ये आहेत.

‘इंडिया’ आघाडीला मुस्लिम समाजाच्या मतांचा फायदा

लोकनीती प्रोग्राम फॉर कंपेरेटिव्ह डेमोक्रसी (CSDS)ने सर्वे केला आहे. त्या सर्वेनुसार, अल्पसंख्याकांची चांगली लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के मुस्लिमांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मतदान केले. तर उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ७९ टक्के मुस्लिमांनी तर बिहार विधानसभा निवडणुकीत ७७ टक्के मुस्लिमांनी इंडिया आघाडीला मतदान केले.
Shashi Tharoor : शशी थरूर यांच्या स्वीय सहाय्यकाला अटक, सोने तस्करी प्रकरणात दिल्ली विमानतळावर रंगे हात पकडले

इंडिया आघाडीकडून ७८ मुस्लिम उमेदवार रिंगणात

यावेळी इंडिया आघाडीच्या वतीने एकूण ७८ मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत, तर गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या ११५ इतकी होती. त्यापैकी २६ जागा निवडून आल्या होत्या.

बसपाने मुस्लिम उमेदवारांना सर्वाधिक तिकिटे दिली

मुस्लिम समाजातील तिकीट वाटपावर जर आपण नजर टाकली तर बहुजन समाज पार्टीने सर्वाधिक ३५ उमेदवार उभे केले आहेत. यानंतर काँग्रेस १९ उमेदवारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तृणमूल कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने उत्तर प्रदेशमध्ये ९९ मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते. त्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी झाली होती.

तर भाजपसाठी अडचण निर्माण होणार

प. बंगालमधील राजकीय विश्लेषक जयंत घोषाल यांनी मुस्लिम समाजाच्या मतांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सध्या ३०% मुस्लिम व्होट बँक काँग्रेस, सीपीएम आणि मुस्लिम सेक्युलर फ्रंट या पक्षांमध्ये विखुरलेली आहे. टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने सीएएच्या मुद्द्यावर भाजपविरोधात प्रचार करत आहेत, त्यानुसार जर हा समुदाय तृणमूलच्या बाजूने गेला तर भाजपला अडचणी येऊ शकतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.