Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lok Sabha Election : नितीश कुमार बनले किंग मेकर! एनडीए की इंडिया आघाडी कोणाला देणार साथ?

12

पाटणा: बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांचे निकाल पौराणिक फिनिक्स पक्ष्याच्या भरारीप्रमाणेच आहेत. फिनिक्सचा निवडणुकीच्या निकालांशी काय संबंध आहे याचा जर तुम्ही विचार करत असाल, तर याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्याच पक्षाने एक उच्च भरारी लोकसभा निवडणुकीत घेतली आहे, फिनिक्स पक्षी स्वतःला जळतो आणि नंतर राखेतून पुन्हा उठतो असे म्हणतात तसेच काहीसे बिहारच्या राजकरणात सध्या दिसते. नितीश कुमार आणि त्यांचा पक्षाला एककीडे कमजोर समजत असतानाच तोच पक्ष सर्वाधिक जागांवर निवडुन आल्याचे चित्र दिसत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांची लोकप्रियता कायम आहे. लोकांमध्ये त्याच्या पक्षाविषयी आणि नेृत्तवाविषयी कोणत्याही शंका नाहीत. एनडीएसोबतची युती नितीशकुमारांनी फायदेशीर ठरते. नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाने यंदाही बिहारमध्ये चांगली कामगिरी केले हा दावा कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळेच कदाचित इंडिया आघाडीचे नेते, ज्यांनी त्यांना आधी समन्वयक भूमिकेसाठी विचारात घेतले नाही, ते आता आशादायक नजरेने नितीश यांच्याकडे पाहताना दिसतायत..
Lok sabha Election Result 2024 : भाजपला पहिल्यांदाच मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, काय होणार परीणाम ?

बिहारमध्ये 2005 पासून नितीश आणि भाजपची युती आहे, तरीही नितीश एनडीए किंवा युपीए सोबत जरी गेले तरी त्यांचा फायदाच होतो. त्यांची सत्तेसाठी युती बदलण्याची सवय असली तरीही त्यांचे कार्य बिहारच्या लोकांसाठी खूप मोठे आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला याची जाणीव असण्याची शक्यता आहे. जमुई येथील निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि लोकांना नितीश यांच्या सरकारचे काम तुम्हाला आवडत असेल तर मतदान करा केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे असे बोलून मतदान करण्याचे आवाहन केले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूने बिहारमधील निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा आग्रह धरला होता. भाजपने सहमती दर्शवली, त्यांना मोकळा हात दिला आणि २०१४ मध्ये त्यांनी पाच जागाही सोडल्या. संयुक्त आघाडीने एनडीएला बिहारमध्ये शानदार विजय मिळवून दिला. JDU ने ४० पैकी १६ जागा जिंकल्या आणि भाजपने १७ जागा मिळवल्या. या एकजुटीमुळे मित्रपक्ष एलजेपीने सुद्धा लढलेल्या सर्व सहा जागा जिंकल्या.
Lok Sabha Election Result 2024: अब की बार महत्प्रयासानं नय्या पार; भाजपची आता N फॅक्टरवर मदार; ‘ते’ दोघे काय करणार?

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलले. एलजेपीचे प्रमुख चिराग पासवान यांनी जेडीयूच्या उमेदवारांविरुद्ध उमेदवार उभे करून राजकीय शड्डू ठोकला, ज्यामुळे सुमारे तीन डझन जागांवर परिणाम झाला. यामुळे जेडीयूला विधानसभेत केवळ ४३ जागा मिळाल्या, त्यामुळे नितीशकुमार नाराज झाले. चिराग पासवान यांच्या कृतीमागे भाजपचा हात असे राजकीय विश्लेषकांचे म्हणे आहे, विशेषत: भाजपचे काही इच्छुक उमेदवार एलजेपीच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्याने संशय व्यक्त करण्याच येतोय. चिराग पासवान यांनीही थेट नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल केला. हाच राग मनात धरुन नितीश यांनी २०२२ मध्ये एनडीए सोडले, आणि इंडिया आघाडीत सामील झाले सरकार स्थापन केले. तरीही, ज्यांच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला होता, त्या आरजेडीसोबत सरकार टिकवणं आव्हानात्मक असेल हे त्यांना माहीत होतं. फक्त १७ महिन्यांनंतर, २०२४ च्या सुरुवातीला, त्यांनी पुन्हा युतीत जाण्याचा निर्णय घेत भाजपसोबत हातमिळवणी केली.
राम मंदिर, कलम ३७० आणि काय काय… पण भ्रमाचा भोपळा फुटला, वाचा भाजपला धक्का बसण्याची ७ कारणं

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीशकुमार यांचा बिहारवरील प्रभाव पुन्हा अधोरेखित होतोय. यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा नितीश कुमारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय. NCP चे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्याशी बोलून गैर-भाजप सरकार स्थापन करण्यात मदत करण्यासाठी त्यांना इंडिया आघाडीत परत येण्याची गळ घातली असे वृत्त समोर येत आहे. इंडिया आघाडी आणि एनडीए घटक पक्षांची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे आणि नितीश उपस्थित राहतील की नाही हे अनिश्चित आहे.

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना पुन्हा इंडिया आघाडीत आण्यासाठी शरद पवारांना नितीश कुमार आणि एमके स्टॅलिन यांना चंद्राबाबू नायडूंची जबाबदारी दिली आहे. दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे संपर्क साधल्याचे वृत्त आहे. तथापि, नितीश कुमार इंडिया आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या पूर्वीच्या वागणुकीबद्दल माफ करतील का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.