Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 7 जून 2024 : मालव्य राजयोग! वृषभ राशीसह या ३ राशींवर राहिल लक्ष्मी देवीची कृपा! इच्छुकांचे विवाह जमतील, वाचा राशीभविष्य

11

Aaj Che Rashi Bhavishya 7 june 2024:
आज ७ जून ज्येष्ठ शुक्ल पक्ष मृगशिरा नक्षत्र आहे. त्यात मालव्य राज योग तयार झाला आहे. जून महिन्याच्या या आठवड्यात ग्रहांचे संक्रमण झाल्यामुळे अनेक राशींवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. मेष राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्याला प्रमोशन मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तर कर्क राशीच्या लोकांना मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. जोडीदारासोबतचे भांडण मिटेल का? संपत्तीत वाढ होईल का? असे अनेक प्रश्न असतील तर मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून

मेष – प्रमोशन मिळेल

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. कुटुंबातील सदस्याला प्रमोशन मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि विवेकाने निर्णय घ्याल. वैयक्तिक बाबींमध्ये चांगली कामगिरी कराल. वडिलधाऱ्यांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा, समस्या उद्भवतील. सामंजस्याची भावना वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवचालीसाचा जप करा

वृषभ – कामाची नवीन संधी मिळेल.

वृषभ - कामाची नवीन संधी मिळेल.

आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागेल. मोठ्या लोकांशी तुमची भेट होईल, ज्यामुळे फायदा होईल. भावा-बहिणीचे भांडण मिटेल. सामाजिक प्रयत्न यशस्वी होतील. काही महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जुना मित्र भेटल्याने आनंदी असाल.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. लक्ष्मी देवीला खीरचा नैवेद्य अर्पण करा.

मिथुन – लक्झरी वस्तू खरेदी कराल

मिथुन - लक्झरी वस्तू खरेदी कराल

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. लक्झरी वस्तू खरेदी कराल. ज्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर येईल. कामाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यावसायिक कामांना चालना मिळेल. जबाबदाऱ्या चांगल्याप्रकारे पार पाडाल. वडिलोपार्जित मालमत्तेत फायदा होईल
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीगणेशाला लाडूचा नैवेद्य अर्पण करा

कर्क – आर्थिक लाभ होतील

कर्क - आर्थिक लाभ होतील

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप विचारपूर्वक पुढे जाण्याचा असेल. नोकरीच्या ठिकाणी स्वत:ला सिद्ध कराल. कामाने अधिकाऱ्यांना प्रभावित कराल, ज्यामुळे तणाव येणार नाही. मुलाच्या करिअरची चिंता सतावेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. तुमची प्रतिष्ठा सर्वत्र पसरेल. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा

सिंह- गुंतवणूक करु नका

सिंह- गुंतवणूक करु नका

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा खर्चीक असेल. वाढत्या खर्चामुळे चिंतेत असाल. व्यवहार करताना काळजी घ्या, अन्यथा समस्या उद्भवतील. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होईल. कोणतीही मोठी गुंतवणूक करु नका.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची पूजा करा

कन्या – कोणाचाही सल्ला घेऊ नका.

कन्या - कोणाचाही सल्ला घेऊ नका.

आजचा दिवस तुमच्यासाठी जबाबदारीने काम करण्याचा आहे. तुमची प्रतिभा सुधारेल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला नवीन काही तरी करण्याचा सल्ला देईल. तुम्हाला तुमच्या कोणत्याही चुकांची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. मालमत्तेचा व्यवहार जपून करा, अडचणींना समोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टींवर सहज विश्वास ठेवू नका.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमान चालीसाचे पठण करा

तुळ – आनंदी असाल

तुळ - आनंदी असाल

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कुटुंबातील सदस्यांबद्दल स्नेह वाढेल. कामाच्या ठिकाणी लहान-मोठ्या चुका माफ कराव्या लागतील. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याने धार्मिक यात्रेला जाल. तुमची दिनचर्या सांभाळा. घरी नवीन पाहूणा आल्याने वातावरण प्रसन्न राहिल. कुटुंबातील सदस्य वस्त असेल. अनावश्यक खर्च वाढेल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

वृश्चिक – लोककल्याणात सहभागी व्हाल

वृश्चिक - लोककल्याणात सहभागी व्हाल

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. लोककल्याणाच्या कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. राजकीय क्षेत्रातकाम करणाऱ्यांना मोठे पद मिळू शकते. तुमचे नेतृत्व क्षमता वाढल्याने आनंदी असाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सल्ला दिल्यास विचार करा. पैशाचा काही भाग धार्मिक गोष्टीत खर्च कराल
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवचालीसाचे पठण करा

धनु – आर्थिक स्थिती मजबूत होईल

धनु - आर्थिक स्थिती मजबूत होईल

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर असेल. महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. एखादा जुना मित्र भेटल्याने आनंदी व्हाल. व्यवसायात नफ्याच्या संधी मिळत राहतील. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. काही महत्त्वाच्या चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल. ज्यामुळे चांगला नफा मिळेल.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा

मकर – मित्रांवर विश्वास ठेवा

मकर - मित्रांवर विश्वास ठेवा

आजचा दिवस तुमच्यात परस्पर सहकार्याची भावना येईल. पार्टनरशीपमध्ये काम करणे तुमच्यासाठी चांगले राहिल. मित्रांवर आणि सहकार्यावर विश्वास ठेवा, अन्यथा समस्या उद्भवतील. कामाच्या ठिकाणी जबाबदारी मिळाली तर टीमवर्कने सहज पूर्ण करु शकाल. सर्वांना सोबत घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्न आणि वस्त्र दान करा

कुंभ – कामाच्या ठिकाणी आव्हाने येतील

कुंभ - कामाच्या ठिकाणी आव्हाने येतील

आजचा दिवस तुमच्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा आहे. घाईने काम केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. कार्यक्षमता वाढेल. तुम्हाला कठोर परिश्रमाचा मार्ग अवलंबून नाव कमवावे लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळेल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखराचा नैवेद्य दाखवा

मीन – शारीरिक समस्या उद्भवतील

मीन - शारीरिक समस्या उद्भवतील

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असणार आहे. तुमच्या ऊर्जेचा योग्य कामात वापर करा. तुम्ही मनाने आनंदी राहाल, ज्यामुळे प्रत्येक काम करण्यास तयार व्हाल. महत्वाच्या विषयात पुढे जाल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. तुमची जीवनशैली सुधारेल. शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देईल. योग आणि व्यायामाद्वारे आराम मिळेल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायमचा अभ्यास करा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.